Mumbai crime branch police arrested thieves saam tv
मुंबई/पुणे

मोठी बातमी! मुंबई पोलिसांनी मोबाईल चोरट्यांच्या मुसक्या आवळल्या; ४९० अँड्रॉईड, ४१ आयफोन जप्त

मुंबईतील गुन्हे शाखेच्या युनिट सहाने मोबाईल चोरट्यांच्या मुसक्या आवळल्या आहेत.

सूरज सावंत

मुंबई : मुंबईतून एक मोठी बातमी समोर आली आहे. मुंबईतील गुन्हे शाखेच्या युनिट सहाने (Mumbai crime branch) मोबाईल चोरट्यांच्या (Mobile thief) मुसक्या आवळल्या आहेत. मोबाईल माफियांचा पर्दाफाश करण्यात मुंबई पोलिसांना यश आलं आहे. मोबाईल चोरट्यांकडे बेकायदेशीर साठा असल्याची खबर पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर गुन्हे शाखेच्या पथकाने धडक कारवाई करत (two culprit arrested) दोन आरोपींना अटक केली आहे. या आरोपींकडून पोलिसांनी ४९० अँड्रॉईड मोबाईल, ४१ आयफोन, १ किलो ५९० ग्रॅम गांजा, दोन तलवारी आणि देशी विदेशी दारुचा साठा जप्त केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईत मोबाईल चोरट्यांना अटक करण्यासाठी गुन्हे शाखेच्या युनिट सहाने धडक मोहीम हाती घेतली होती. त्यानंतर या पथकाने दोन मोबाईल चोरट्यांच्या अटक केली असून त्यांच्याकडे मोठ्या प्रमाणावार मोबाईलचा साठा सापडला. एव्हढच नाही तर १ किलो ५९० ग्रॅम गांजा, दोन तलवारी आणि देशी विदेशी दारुचा साठाही पोलिसांनी जप्त केला आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात मोबाईलचा मुद्देमाल चोरट्यांकडे सापडल्याने या गुन्ह्यात कोणत्या टोळीचा सहभाग आहे का? याचा शोध पोलीस घेत आहेत.

दरम्यान, आरोपी चोरीच्या मोबाईलचे आयएमईआय नंबर बदलून ते देशाच्या इतर राज्यांसह परदेशात विकायचे. तसेच गांजा, विदेशी दारू आणि बेकायदेशीर शस्त्रांचाही पुरवठा या आरोपींकडून केला जायचा. या आरोपींचा अड्डा मानखूर्द शहरात असल्याची खबर गुन्हे शाखेला मिळाली होती. त्यानंतर पोलिसांनी त्या ठिकाणी धाड टाकून आरोपींकडे असलेला मुद्देमाल जप्त केला.

Edited By - Naresh Shende

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT