Police recover 7 stolen mobile phones worth ₹4.84 lakh from an accused at Andheri railway station during Operation Yatri Suraksha. 
मुंबई/पुणे

Mumbai Crime: अंधेरी स्थानकात मोठी कारवाई; ४.८४ लाखांचे ७ मोबाईल जप्त, आरोपीला ठोकल्या बेड्या

Mumbai Crime : अंधेरी रेल्वे स्थानकात मोठी कारवाई करण्यात आली आहे. मोबाईल चोरी करणाऱ्या एका सराईत आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे.

Bharat Jadhav

संजय गडदे, साम प्रतिनिधी

रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षेसाठी राबविण्यात येत असलेल्या ऑपरेशन यात्री सुरक्षा अंतर्गत अंधेरी रेल्वे स्थानकात मोठी कारवाई करण्यात आली आहे. सीसीटीव्ही आणि फेस रिकग्निशन सिस्टिम (FRS) च्या मदतीने मोबाईल चोरी करणाऱ्या एका सराईत आरोपीला ताब्यात घेण्यात आले असून त्याच्याकडून एकूण ७ मोबाईल फोन जप्त करण्यात आले आहेत. जप्त मोबाईलमध्ये ५ आयफोन असून एकूण किंमत ४ लाख ८४ हजार ५८० रुपये इतकी आहे.

अंधेरी रेल्वे स्थानक परिसरात विविध दिवशी मोबाईल चोरीच्या घटना घडल्या होत्या. यात ८ जानेवारी रोजी ८२,९०० रुपयांचा आयफोन, १० जानेवारी रोजी ८४ हजार रुपयांचा आयफोन, ८ एप्रिल रोजी ८२ हजार रुपयांचा आयफोन, २२ एप्रिल रोजी १३,७०० रुपयांचा नथिंग मोबाईल आणि २५ एप्रिल रोजी ३१ हजार रुपयांचा मोटोरोला मोबाईल चोरीला गेला होता.

या घटनांच्या पार्श्वभूमीवर वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली अंधेरी CPDS पथकाकडून सतत नजर ठेवण्यात येत होती. आज २५ एप्रिल रोजी हेड कॉन्स्टेबल नवीन, कॉन्स्टेबल अनुज, दीपक आणि शैलेन्द्र यांच्या पथकाने अंधेरी स्थानकात संशयित व्यक्तीला FRS च्या मदतीने ओळखून ताब्यात घेतले. चौकशीत आरोपीने आपले नाव लक्ष्मीकांत राजेंद्र प्रसाद (वय ३०) असे सांगितले.

तो उत्तर प्रदेशातील जालौन जिल्ह्यातील रहिवासी असून अंधेरी स्थानकातील पाच मोबाईल चोरीच्या गुन्ह्यांची कबुली त्याने दिली. पुढील सखोल चौकशीत तो आणखी दोन मोबाईल चोरी प्रकरणांत सहभागी असल्याचे समोर आले. यामध्ये मुंबई सेंट्रल आणि बोरिवली येथील गुन्ह्यांचाही समावेश आहे. यानंतर आरोपीला पुढील कायदेशीर कारवाईसाठी अंधेरी जीआरपीच्या ताब्यात देण्यात आले. त्याच्याविरोधात भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०३(२) अंतर्गत विविध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या कारवाईमुळे रेल्वे स्थानकांवरील मोबाईल चोरट्यांविरोधात सुरक्षा यंत्रणेला मोठे यश मिळाले असून प्रवाशांच्या सुरक्षेच्या दृष्टीने महत्त्वाची कारवाई मानली जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

India vs Ireland 1st T20I: भारताचा आयर्लंडकडून पहिल्यांदाच पराभव, 'या' ५ कारणामुळे सामन्यासह टीम इंडियानं गमवाली टी-२० मालिका

महसुलात 20 हजार कोटींचा घोटाळा? मुद्रांक शुल्कावर अधिकाऱ्यांचा डल्ला

Beijing Plane Crash: सर्वात उंच इमारतीला विमान धडकलं; थरकाप उडवणारा व्हिडिओ व्हायरल

लोहगड हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट, सिया-चेतनचं प्रेम, खुनानंतर ब्लेम गेम, केतनला टक्कल, नात्यात दुराव्याचं कारण?

Maharashtra News Live Update: यवतमाळ शहरात मुसळधार पावसाला सुरूवात

SCROLL FOR NEXT