Mumbai Wadala Murder Crime News Saam Tv
मुंबई/पुणे

Mumbai : भयंकर! दारूनं केली संसाराची राखरांगोळी; नवऱ्याच्या डोक्यात धुंदी चढली, बायकोला निर्घृणपणे संपवलं

Mumbai Crime News : मुंबईतील वडाळा परिसरात दारूच्या नशेत पतीने पत्नीवर हल्ला करून तिची हत्या केल्याची घटना समोर आली आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली असून तपास सुरू आहे.

Alisha Khedekar

  • वडाळ्यात पतीकडून पत्नीची हत्या

  • दारूच्या वादातून घटना घडली

  • महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू

  • पोलिसांनी आरोपीला अटक केली

Mumbai Wadala Murder Crime News मुंबईतील वडाळा परिसरात दारू पिण्याच्या वादातून एका महिलेची हत्या करण्यात आली आहे. मृत महिलेचे नाव कविता महेश वाड असे आहे. मुंबई पोलिसांनी सांगितले की, आरोपी पती महेश नारायण वाड घटनेनंतर घटनास्थळावरून फरार झाला होता, परंतु नंतर त्याला पोलिसांनी अटक केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, कविता आणि महेश यांच्यामध्ये वारंवार भांडण होत होती. महेश हा भरपूर दारू प्यायचा आणि पत्नीला मारहाण करायचा. घटनेच्या दिवशी महेश नशेत होता. त्यामुळे त्यांच्यामध्ये पुन्हा एकदा वाद झाला. रागाच्या भरात त्याने कवितावर हल्ला केला, ज्यामुळे तिला गंभीर दुखापत झाली. कविताची प्रकृती गंभीर असूनही, त्याने तिला तात्काळ रुग्णालयात नेले नाही. नंतर कविता घरीच बेशुद्ध पडली शेजाऱ्यांनी तिला रुग्णालयात नेले, मात्र उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला.

अधिकाऱ्यांनी सांगितले की, आरोपीने आपल्या पत्नीवर निर्घृणपणे हल्ला केला, तिला लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली, ज्यामुळे ती गंभीर जखमी झाली. तसेच वेळेवर वैद्यकीय उपचार न मिळाल्याने तिची प्रकृती खालावली असावी. शवविच्छेदनातून असे दिसून आले की, कवितावर अत्यंत गंभीर शारीरिक हल्ला झाला होता. तिच्या शरीरावर अनेक काळे-निळे व्रण होते. याप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CJP ला झटका; शिवाजी पार्कवरच्या आंदोलनाला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली

IND vs WI 1st ODI: विराट कोहलीची शतकीय खेळी; ८ गडी राखून भारताचा वेस्ट इंडिजवर शानदार विजय

किंग कोहलीने इतिहास रचला; ‘विराट’ षटकारासह ‘रन मशिनचे ५५ वे शतक, सचिन तेंडुलकरचे दोन मोठे विक्रम

Maharashtra News Live Update: भामरागडमधून दिलासादायक बातमी; पुराचे पाणी हळूहळू ओसरू लागले

साधेपणाने लग्न केलेल्यांना मुलं झाली नाहीत का? दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर विखेंचं अजब विधान

SCROLL FOR NEXT