Mumbai News Saam Tv
मुंबई/पुणे

Shocking : बाप की हैवान! सावत्र बाप लेकीच्या छातीला स्पर्श करायचा, मिठ्या मारायचा अन्..., मुंबईतील धक्कादायक घटना

Mumbai Dahisar Crime News : मुंबईतील दहिसर परिसरात १४ वर्षीय मुलीचा तिच्याच सावत्र बापाकडून विनयभंग झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. पोलिसांनी तातडीने कारवाई करत आरोपीला अटक केली आहे.

Alisha Khedekar

  • मुंबईत अल्पवयीन मुलीचा विनयभंग

  • सावत्र बाप आरोपी

  • पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल

  • पोलिसांची तातडीची कारवाई

मुंबईतील दहिसर परिसरात वडिलांच्या नात्याला काळिमा फासणारी घटना घडली आहे! १४ वर्षीय मुलीचा तिच्याच सावत्र बापाने विनयभंग केल्याचा संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून आरोपीला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. शिवाय त्याच्यावर पोक्सो कलमांतर्गत कारवाई करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी ही चौदा वर्षांची असून ती दहिसर येथे राहते. गेल्या एक काही दिवसांपासून तो तिच्याशी जवळीक साधून अश्लील चाळे करायचा. तिला मिठी मारून, तिच्या छातीला अश्लील स्पर्श करत तिचा विनयभंग करायचा. हा प्रकार गेले कित्येक दिवस सुरु होता. या घटनेने ती प्रचंड घाबरली होती. बदनामीमुळे तिने हा प्रकार कोणालाही सांगितला नाही.

दोन दिवसांपूर्वी नराधमाने पुन्हा तिच्याशी अश्लील चाळे करून तिचा विनयभंग करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर तिने दहिसर पोलिसांत धाव घेत घडलेला प्रकार सांगितला आणि सावत्र बापाविरुद्ध तक्रार केली. या घटनेची पोलिसांनी तातडीने गंभीर दखल घेत तिच्या सावत्र बापाविरुद्ध विनयभंगासह पोक्सो कलमांतर्गत गुन्हा दाखल केला.

यानंतर पोलिसांनी काही तासांतच आरोपीला अटक केली. अटकेनंतर त्याला दिंडोशीतील सत्र न्यायालयात हजर करण्यात आले. याप्रकरणी पोलीस पुढील तपास करत आहेत. दरम्यान या घटनेनंतर मुली स्वतःच्या घरात देखील सुरक्षित नाहीत का असा संतप्त सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CJP ला झटका; शिवाजी पार्कवरच्या आंदोलनाला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली

IND vs WI 1st ODI: विराट कोहलीची शतकीय खेळी; ८ गडी राखून भारताचा वेस्ट इंडिजवर शानदार विजय

किंग कोहलीने इतिहास रचला; ‘विराट’ षटकारासह ‘रन मशिनचे ५५ वे शतक, सचिन तेंडुलकरचे दोन मोठे विक्रम

Maharashtra News Live Update: भामरागडमधून दिलासादायक बातमी; पुराचे पाणी हळूहळू ओसरू लागले

साधेपणाने लग्न केलेल्यांना मुलं झाली नाहीत का? दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर विखेंचं अजब विधान

SCROLL FOR NEXT