मुंबई: गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णाच्या (corona patient) दैनंदिन संख्येत पुन्हा वाढ होत असल्याचे चित्र आहे. राज्य सरकार आणि आरोग्य विभागाची चिंता वाढलेली असतानाच, आता चिंता वाढवणारी आकडेवारी समोर आली आहे. मुंबईतील कोविड रुग्णालयांमधील आयसीयूमध्ये (ICU) दाखल होणाऱ्या रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. एप्रिलच्या तुलनेत कोविड १९ मुळे रुग्णालयांत दाखल होणाऱ्या रुग्णांची संख्या २३१ टक्क्यांनी वाढली आहे. सोमवारपर्यंत शहरातील रुग्णालयांमध्ये २१५ रुग्ण दाखल झाले आहेत. तर एप्रिलमध्ये रुग्णांची संख्या ६५ होती. (Corona Update in Mumbai)
मुंबई आणि उपनगरांत गेल्या काही दिवसांपासून कोरोनाने (Corona) डोके वर काढलेले आहे. रिपोर्टनुसार, रुग्णालयांमध्ये उपचारासाठी दाखल होणाऱ्या कोरोना रुग्णांचे वय ६० वर्षांवरील आहे किंवा ते अन्य व्याधींनीही ग्रस्त आहेत, अशी माहिती समोर आली आहे. आकडेवारीनुसार, १० पैकी ८ रुग्ण हे ६० वर्षांवरील आहेत, तर त्यातील दोनपेक्षा अधिक रुग्ण इतर आजारांनी ग्रस्त आहेत.
मुंबईत सलग पाचव्या दिवशी ३०० पेक्षा अधिक रुग्ण
मुंबईत कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. दैनंदिन रुग्णसंख्या आता ३०० पार पोहोचली आहे. महाराष्ट्रातही कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, सोमवारी एकट्या मुंबईत ३१८ नवे कोरोना रुग्ण आढळले. मुंबईत सलग पाचव्या दिवशी ३०० नवीन रुग्णांची नोंद झाली. रविवारी ३७५ कोरोनाबाधित नोंदवले गेले. मुंबईत कोरोना रुग्णांची एकूण संख्या १० लाख ६५ हजार २९६ झाली आहे.
Edited By - Nandkumar joshi
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.