Mumbai news Saam tv
मुंबई/पुणे

मुंबईकरांचा प्रवास सुसाट होणार; 2 नवीन मेट्रो मार्ग आजपासून सेवेत, स्थानकं अन् तिकीट किती?

mumbai metro : दोन नवीन मेट्रो मार्गामुळे मुंबईकरांचा प्रवास सुसाट होणार आहे. नवीन मार्गावरील मेट्रोचे तिकीट दर किती असेल, जाणून घ्या.

Vishal Gangurde

मुंबईत दोन नवीन मेट्रो मार्ग आजपासून सुरू

मुंबईतील अंधेरी–मीरा भाईंदर आणि मंडाळे–डायमंड गार्डन मार्गांचा समावेश आहे.

नवीन मेट्रो मार्गामुळे प्रवास अधिक जलद होणार

मुंबई उपनगरातील नागरिकांचा प्रवास सुसाट होणार आहे. दोन नवीन मेट्रो आजपासून सेवेत उपलब्ध होणार आहेत. या नवीन मेट्रो सेवेमुळे मुंबईकरांची वाहतूक कोंडीतून सुटका होणार आहे. मुंबई उपनगरातील नागरिकांचा अंधेरी पूर्व ते मीरा भाईंदर, मंडाळे–डायमंड गार्डन या मार्गावरील प्रवास वेगवान होणार आहे. या मार्गावर नेमके किती स्थानक आणि तिकीट दर किती आहेत, जाणून घेऊयात.

मुंबई उपनगरात नवीन दोन मार्ग सेवेत उपलब्ध झाल्याने नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. नवीन मेट्रोमुळे अंधेरी पूर्व ते मीरा भाईंदर (काशिगाव)दरम्यान थेट मेट्रो प्रवास शक्य होणार आहे. तर चेंबूरमधून मानखुर्दपर्यंत वाहतूक कोंडीविना वेगवान पोहोचता येणार आहे. हार्बर मार्गाजवळील परिसरात राहणाऱ्यांनाही मेट्रोची सुविधा मिळणार आहे.

मेट्रो लाईन ७ आणि लाईन ९ एकत्रितपणे चालवल्यामुळे प्रवाशांचा वेळ वाचणार आहे. तसेच या नागरिकांचा प्रवास अधिक जलद आणि सोयीस्कर होणार आहे. तसेच मुंबई उपनगरमधील मेट्रो लाईन २ ए आणि लाईन ७ आता स्वतंत्रपणे चालवण्यात येणार आहेत. मेट्रोच्या वेळापत्रकानुसार गर्दीच्या वेळेत ५ ते ६ मिनिटांत मेट्रो उपलब्ध होणार आहे. तर इतर वेळेत मेट्रो ८ ते १० मिनिटांत उपलब्ध होईल. यामुळे प्रवाशांची प्रतीक्षा वेळ कमी होणार आहे.

नवीन मेट्रोमुळे काय फायदा होणार?

नवीन मेट्रोमुळे अंधेरी ते काशिगाव थेट प्रवास होणार आहे. तर नवीन भागांना मेट्रो कनेक्टिव्हिटी मिळणार आहे. मेट्रोसाठी प्रतीक्षा करण्याची वेळ देखील कमी असणार आहे. मेट्रोमुळे जलद आणि आरामदायी प्रवास होणार आहे. तर सोपे आणि सुधारित वेळापत्रक नागरिकांना उपलब्ध होणार आहे.

नवीन मार्गिकांमुळे मुंबई मेट्रो नेटवर्क अधिक मजबूत होणार आहे. तसेच भविष्यात ३३७ किमीचे एकात्मिक मेट्रो जाळे उभारण्याचे उद्दिष्ट आहे. दोन्ही मार्गावर लांबच्या प्रवासासाठी २० रुपये मोजावे लागणार आहेत. तर जवळच्या प्रवासासाठी १० रुपये मोजावे लागणार आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: मुसळधार पावसाचा फटका; मुंबई-अहमदाबाद महामार्गाच्या सर्विस रोडवर दरड कोसळली

Dark Chocolate Benefits: हृदयापासून मेंदूपर्यंत आरोग्याला मिळतात अनेक लाभ; डार्क चॉकलेट खाण्याचे ७ जबरदस्त फायदे

पावसाळ्यात बनवा चटपटीत टोमॅटो चीज चटणी पकोडा; एकदा खाल्लं की खातच राहाल|Tomato Cheese Chutney Pakoda

Chanakya Niti: राग संपवू नका, त्यावर नियंत्रण ठेवा; चाणक्यांनी यश मिळवण्यासाठी दिला मोलाचा सल्ला

Paneer Puff Recipe: घरच्या घरी बनवा खुसखुशीत पनीर पफ; चहासोबत लागेल भन्नाट चव

SCROLL FOR NEXT