ही कार फुटबॉलसारखी थेट हवेत उडालीये. मुंबईतल्या 14 हजार कोटींच्या कोस्टल रोडवरील भीषण अपघाताची ही थरारक दृश्ये आहेत. हाजी अली परिसरात कोस्टल रोडच्या पुलावरून भरधाव वेगात असलेली BMW कार थेट खाली रस्त्यावर कोसळली. या अपघातानं संपूर्ण मुंबईकरांना हादरवून सोडलंय. या अपघाताचा थरकाप उडवणारा व्हिडिओ पाहून तुम्हाला कळेल हा अपघात किती भीषण होता...
या भीषण अपघाताची माहिती मिळताच कोस्टल रोड नियंत्रण कक्षानं कारमधील चारही जणांना उपचारासाठी नायर रुग्णालयात दाखल केलं. मात्र, रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच तिघांना मृत घोषित करण्यात आलं. या अपघातातील मृतांची नावे काय आहेत ते पाहूयात...
कोस्टल रोडवर BMW कारचा अपघात
धैर्य सेठ
वय - 17 वर्ष
मृत
आदीत्य जकासनिया
वय - 19 वर्ष
मृत
शनय गज्जल
वय - 21 वर्ष
मृत
आदीत्य ओसवाल
वय - 19 वर्ष
जखमी
पहाटे 5.30च्या सुमारास झालेल्या दुर्घटनेमुळे मुंबईत हळहळ व्यक्त होत असून पोलीस पुढील तपास करत आहेत.
दरम्यान कोस्टल रोडवरील BMW कारचा अपघात नेमका कुठे घडलाय तेही एकदा पाहूयात..
मात्र, अपघाताचा हा काही पहिलाच प्रकार नाही. याआधी कोस्टल रोडवर हाजी अली ते वरळी बोगद्यात एका धावत्या कारने क्षणात पेट घेतल्यानं गाडीतल्या चौघांनी कशाबशा बाहेर उड्या मारल्या आणि जिवाच्या आकांताने पळ काढला होता. त्यामुळे कोस्टलवरील सुरक्षा यत्रणेचा फज्जा उडाला होता. या BMW अपघातामुळे कोस्टल रोडवरील वाहनांच्या अतिवेगाचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय. एव्हंढच नव्हे तर वाहनांच्या भरधाव वेगावर चाप लावण्याची गरज या निमित्तानं पुन्हा एकदा अधोरेखित झालीये. नाहीतर मुंबईला गतिमान करणारा कोस्टल रोड मुंबईकरांच्या जीवावर उठल्याशिवाय राहणार नाही.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.