Mumbai Swachh Survekshan Ranking Saam TV
मुंबई/पुणे

Mumbai News: स्वच्छतेत मुंबईची पुन्हा घसरगुंडी, राष्ट्रीय सर्वेक्षणात ३७व्या क्रमांकावर; नवी मुंबई कोणत्या स्थानी?

Mumbai Swachh Survekshan Ranking: शहर स्वच्छतेबद्दल अनेक उपक्रम राबवण्याचे मुंबई महापालिकेचे दावे पुन्हा एकदा फोल ठरले आहेत. राष्ट्रीय स्वच्छ सर्वेक्षणात मुंबईचा क्रमांक घसरला आहे.

Satish Daud

Swachh Survekshan Awards 2023

शहर स्वच्छतेबद्दल अनेक उपक्रम राबवण्याचे मुंबई महापालिकेचे दावे पुन्हा एकदा फोल ठरले आहेत. राष्ट्रीय स्वच्छ सर्वेक्षणात मुंबईचा क्रमांक घसरला आहे. गुरुवारी स्वच्छ सर्वेक्षण २०२३ चा निकाल आला. त्यात मुंबई शहर ३७व्या क्रमांकावर फेकले गेले आहे. विशेष बाब म्हणजे ठाणे, कल्याण-डोंबिवली आणि वसई-विरार देखील मुंबईला स्वच्छतेच्या बाबतीत मागे टाकलं आहे.  (साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

२०१५ मध्ये मुंबईचा देशातील स्वच्छ शहरांच्या स्पर्धेत दुसरा क्रमांक आला होता. मात्र, त्यानंतर मुंबईचा पहिल्या तीनमध्ये समावेश झालेला नाही. स्वच्छतेत मुंबईला ७५०० पैकी केवळ ४४४६.१९ गुण मिळाले आहे. २०२२ मध्ये स्वछतेच्या बाबतीत मुंबईचा क्रमांक ३१वा होता.

मात्र, यंदा त्यात तब्बल ६ स्थानांनी घसरण झाली आहे. मागील काही महिन्यांपासून मुंबई शहराला कचरामुक्त करण्यात महापालिकेला पुरते अपयश येत आहे. हीच बाब लक्षात घेता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील रस्त्यावरून उतरवून डीप क्लीन ड्राईव्ह अभियानाला सुरुवात केली होती. (Latest Marathi News)

मात्र, तरी देखील राष्ट्रीय स्वच्छ सर्वेक्षणात मुंबईचा क्रमांक घसरला आहे. दुसरीकडे नवी मुंबई आणि पुणे शहराने या सर्वेक्षणात पहिल्या १० मध्ये स्थान मिळवलं आहे. इंदूरने सर्वात स्वच्छ शहर म्हणून सलग सातव्यांदा पहिला क्रमांक मिळवला आहे.

स्वच्छतेच्या बाबतीत गुजरातमधील सूरत हे शहर दुसऱ्या क्रमांकावर तर महाराष्ट्रातल्या नवी मुंबईने स्वच्छ शहरांच्या यादीत तिसरा क्रमांक पटकावला आहे. स्वच्छ राज्यांच्या यादीत महाराष्ट्राचा पहिल्या क्रमांकाचं राज्य ठरलं आहे. वार्षिक स्वच्छता सर्वेक्षणात महाराष्ट्राने पहिला क्रमांक पटकावला आहे. मध्य प्रदेश दुसऱ्या तर छत्तीसगढ तिसऱ्या क्रमांकावर आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

VIDEO : क्षणभर विश्रांती! आदित्य ठाकरेंनी प्रचारादरम्यान लुटला गल्ली क्रिकेटचा आनंद

Liver Health: हे '४' पेय करतात यकृतावर गंभीर परिणाम ; तुम्हीही करता का या पेयांचे सेवन, वेळीच व्हा सावध

Maharashtra News Live Updates: गुजरातच्या पोरबंदरवरून मोठा अमली पदार्थांचा साठा जप्त

Maharashtra Politics : भाजपला विनंती, उद्धव ठाकरे म्हणाले मी बोलणी करायला तयार

Kitchen tips: हात खराब न करता चपातीचं पीठ कसं भिजवाल? पाहा एक सोपा देसी जुगाड

SCROLL FOR NEXT