Chhatrapati Shivaji Maharaj Terminus Threats Call  
मुंबई/पुणे

CSMT स्थानकामध्ये RDX ठेवल्याची धमकी; अवघ्या काही तासात कॉल करणाऱ्याला अटक

Chhatrapati Shivaji Maharaj Terminus Threats Call : छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसमध्ये आरडीएक्स ठेवल्याची धमकी देणारा कॉल एका व्यक्तीने केला होता. धमकीचा कॉल आल्यानंतर लोहमार्ग पोलिसांनी तपास करत कॉल करणाऱ्याला अटक केलीय.

Bharat Jadhav

सचिन गाड, साम प्रतिनिधी

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसमध्ये RDX ठेवल्याचा धमकी देणारा कॉल आला होता. पोलिसांनी अवघ्या काही तासात धमकीचा कॉल करणाऱ्याला बेड्या ठोकल्या आहेत. लोहमार्ग पोलिसांना हा धमकीचा कॉल आला होता. धमकीचा फोन येताच पोलीस यंत्रणा सतर्क झाली होती.

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसमध्ये RDX असल्याची धमकी देणारा कॉल येताच लोहमार्ग पोलिसांनी तपासला सुरुवात केली. त्यानंतर स्थानकाची तपासणी केली असता हा अफवा असल्याचं निदर्शनात आलं. त्यानंतर कॉल कोणी आणि कुठून करण्यात आला याचा तपास पोलिसांनी केला असता पवन कुमार नावाच्या इसमाला अटक करण्यात आलीय. पवन कुमार याने फोन करून आरडीएक्स ठेवणार असल्याची धमकी दिली होती. गुन्हे शाखा पुढील तपास करण्यात येणार असल्याची माहिती लोहमार्ग वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय तायडे यांनी दिली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

8th Pay Commission : सरकारी कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी! 7 वर्षांत पगार दुप्पट? वाचा 8व्या वेतन आयोगाचे कॅलक्युलेशन

माझा पुतण्या आज ना उद्या पंतप्रधान होईल; देवेंद्र फडणवीस यांच्या काकांना विश्वास

Maharashtra News Live Update: कणकवलीत अन्न व औषध प्रशासन विभागाची धडक तपासणी

Maharashtra Freedom of Religion Act 2026: राज्यात महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य कायदा लागू; उल्लंघन केल्यास ७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा

Kavlya Fort : उंच शिखरावर उभा असलेला 'कावळ्यागड' कधी पाहिला का? सह्याद्रीत लपलेला सुंदर किल्ला

SCROLL FOR NEXT