Mumbai Chembur School News Saam Tv
मुंबई/पुणे

Mumbai School News : हातावर मेहंदी काढली म्हणून १५ ते २० मुलींना काढले वर्गाबाहेर, मुंबईतील शाळेचा धक्कदायक प्रकार!

Mumbai Chembur School News : मुंबईत एका नामांकित शाळेत मुलींनी हातावर मेहंदी काढल्याने १५ ते २० विद्यार्थिनींना वर्गातून बाहेर काढण्यात आले. या प्रकरणी पालकांनी संताप व्यक्त केला असून शिक्षण विभागाने शाळेला चौकशीसाठी नोटीस बजावली आहे.

Alisha Khedekar

मुंबईतील शाळेत हातावर मेहंदी काढल्याने विद्यार्थिनींना वर्गात प्रवेश नाकारला

शिक्षण विभागाने चौकशी करून शाळेला नोटीस बजावली

शाळेने आरोप फेटाळून लावला

पालकांमध्ये संताप

सणासुदीला सजणे, नवीन कपडे घालणे, दागिने घालणे, हातावर मेहंदी काढणे हा मुलींच्या आवडीचा भाग आहे. मात्र मेहंदी काढून शाळेत गेल्याने १५ ते २० विद्यार्थिनींना वर्गातून बाहेर काढल्याची घटना घडली आहे. ही घटना मुंबईतील चेंबूरमध्ये घडली आहे. या घटनेने पालकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.

मुंबईतील चेंबूरमधील एका नामांकित शाळेत दिवाळीच्या सुट्टीनंतर वर्ग भरला. मात्र या वर्गात काही विद्यार्थिनी हातावर मेहंदी लावून शाळेत गेल्या असता त्यांना वर्गात बसण्यास नकार देण्यात आला. शिक्षकांनी त्यांना मेहंदी काढल्याशिवाय वर्गात प्रवेश न देण्याचा इशारा दिला. असा आरोप विद्यार्थिनींच्या पालकांनी केला आहे. शिक्षकांनी वर्गाबाहेर काढल्याने मुलींनी मानसिक तणाव घेतल्याचेही पालकांनी सांगितले.

घडलेल्या प्रकरणाची गंभीर दखल घेत उपशिक्षणाधिकारी आणि शिक्षण निरीक्षक डॉ. मुश्ताक शेख यांनी सोमवारीच शाळेला भेट देत संपूर्ण चौकशी केली. प्राथमिक चौकशीत काही विद्यार्थिनींना मेहंदी लावल्याने वर्गात प्रवेश नाकारल्याचे लक्षात आल्याने शिक्षण विभागाने शाळेला थेट नोटीस बजावली. मेहंदीमुळे वर्गात बसू न देणे हे नियमबाह्य आणि विद्यार्थ्यांच्या हक्कांवर गदा आणणारे आहे,असे स्पष्ट नमूद करत शाळेला आज लेखी खुलासा सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

दरम्यान शिक्षकांनी हा आरोप फेटाळला असून असा प्रकार घडल्याचे पूर्णपणे नाकारले आहे. शिवाय सदर शाळेच्या मुख्याध्यापिकांनी म्हटले आहे की, शाळेत असा कोणताही प्रसंग घडलेला नाही. विद्यार्थिनींना फक्त शिस्तीचे नियम पाळण्यास सांगितले. शिक्षण विभागाची नोटीस अद्याप आम्हाला मिळालेली नाही. मात्र, पालकांचे वेगळे दावे परिस्थिती आणखी गुंतागुंतीची करत आहेत. या घटनेने पालकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

हिवाळी अधिवेशनात मोठी घोषणा होणार; १८ विधेयके मांडली जाणार, लाडकी बहीण योजनेवरही फडणवीसांचं मोठं वक्तव्य

Bigg Boss 19: 'सलमान खानसोबत स्टेज शेअर करू नको...'; प्रसिद्ध अभिनेत्याला लॉरेन्स बिश्नोई गँग कडून धमकी

Bigg Boss 19 Grand Finale : शेवटच्या क्षणी बाजी पलटली; 'बिग बॉस १९'चा स्ट्राँग स्पर्धक घराबाहेर, नाव वाचून बसेल धक्का

कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळणार? ऑफिस वेळेनंतर नो कॉल-नो ईमेल

स्मृती-पलाशचं लग्न अखेर मोडलं, पुढे जाण्याची वेळ आली आहे

SCROLL FOR NEXT