MUMBAI SHOCKER: HUSBAND FORCES WIFE TO STAY IN ‘MURGA’ POSITION FOR 4 HOURS, RCF POLICE ARREST ACCUSED Saam Tv
मुंबई/पुणे

Mumbai Crime: भयानक ! पत्नीला ४ तास 'कोंबडा' बनवून अमानुष मारहाण; तडीपार आरोपीला पोलिसांनी ठोकल्या बेड्या

Mumbai Chembur News : मुंबईतील चेंबूर येथे एका विवाहितेवर तिच्या पतीने अमानुष अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली असून पुढील तपास सुरू आहे.

Alisha Khedekar

  • चेंबूरमध्ये पतीने पत्नीवर अमानुष अत्याचार केल्याची घटना

  • आरोपीने पत्नीला चार तास ‘कोंबडा’ बनवून ठेवत बेदम मारहाण केली

  • तलवारीने मारण्याची आणि ॲसिड हल्ला करण्याची धमकीही दिली गेली

  • आरसीएफ पोलिसांनी आरोपी अरबाज सय्यदला ताब्यात घेतले

Mumbai Chembur Crime News मुंबईतील चेंबुरमधून संतापजनक बातमी समोर आली आहे. एका महिलेला तिच्या पतीने धमकावत अमानुषरीत्या मारहाण केली. धक्कादायक म्हणजे या महिलेला ४ तासांसाठी कोंबडा बनण्याची शिक्षा दिली. याप्रकरणी महिलेने पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून आरसीएफ पोलिसांनी ३० वर्षीय अरबाज अन्वरअली सय्यदला ताब्यात घेतले आहे. त्याच्याविरुद्ध यापूर्वीच १८ गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी अरबाजला दारू आणि गांजाचे व्यसन असल्याने त्याचे पत्नीसोबत वारंवार वाद होत होते. तसेच त्याला डिसेंबर २०२५ पासून १२ महिन्यांसाठी हद्दपार करण्यात आले होते. त्यामुळे त्याची २५ वर्षीय पत्नी मुलांसह माहेरी राहत होती. गुरुवारी अरबाज पत्नीच्या माहेरी गेला आणि तिला जीन्स पॅन्ट तसेच अत्तराची बाटली खरेदी करून देण्याचे आश्वासन देत चेंबूर येथील घरी घेऊन आला. मात्र घरी पोचताच त्याने पत्नीशी वाद घालत शिवीगाळ सुरू केली. त्यानंतर हाताने, पायाने आणि पट्ट्याने तिला बेदम मारहाण केली.

एवढ्यावरच न थांबता तलवारीने मारून टाकण्याची तसेच अंगावर ॲसिड फेकण्याची धमकी दिली. धक्कादायक बाब म्हणजे आरोपीने पत्नीला तब्बल चार तास ‘कोंबडा’ बनवून ठेवले. तसेच तिच्या आई-वडिलांना आणि मुलालाही ठार मारण्याची धमकी दिली. रात्री साडेआठ वाजेपर्यंत तिला घरातच कोंडून ठेवण्यात आले होते. दरम्यान, आरोपीला डुलकी लागल्याची संधी साधून संबंधित महिलेने रात्री नऊच्या सुमारास घरातून पळ काढला आणि थेट आपल्या आई-वडिलांच्या घरी पोचली. ही बाब समजताच संतप्त झालेल्या अरबाजने तिच्या माहेरी धाव घेतली. तेथेही त्याने पत्नीला मारहाण केली आणि चाकूने हल्ला केला.

घटनास्थळी उपस्थित नागरिकांना आरोपीने चाकू दाखवून धमकावल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले. माहिती मिळताच आरसीएफ पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत आरोपीला ताब्यात घेतले. जखमी महिलेवर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू असून पोलिसांनी आरोपीविरुद्ध विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: नीट पेपरफुटी प्रकरणी मनिषा हवालदारची जेलमध्ये रवानगी

Rajeev Verma: अमिताभ बच्चन यांचे साडू, प्रसिद्ध अभिनेते अचानक बॉलिवूडपासून झाले दूर; आता चालवतात हॉटेल

एकही केस गळणार नाय! रात्री झोपण्यापूर्वी करा 'हा' 1 सोपा उपाय; केस होतील लांब आणि मजबूत

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींचा तळतळाट महायुतीला पडेल महागात; वडेट्टीवारांचा सरकारवर आरोप

Marathi Serial: 'मी सावित्रीबाई ज्योतिराव फुले' मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप; खासदार अमोल कोल्हेंनी सांगितलं कारण

SCROLL FOR NEXT