Mumbai Chembur Crime News  AI Image
मुंबई/पुणे

Shocking : मुंबई हादरली! गरोदर गर्लफ्रेंडच्या कोल्ड्रिंक्समध्ये डांबर गोळ्या मिसळल्या; पुढे जे बॉयफ्रेंडने केलं ते भयंकर...

Mumbai Chembur Crime News : मुंबईतील चेंबूरमध्ये २४ वर्षीय दोन महिन्यांची गर्भवती तरुणीचा संशयास्पद मृत्यू झाला. कोल्ड्रिंकमध्ये गोळ्या मिसळल्याच्या संशयातून प्रियकर आशिष मगरला अटक करण्यात आली असून न्यायालयाने पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

Alisha Khedekar

  • मुंबईतील चेंबूरमध्ये धक्कादायक घटना

  • २४ वर्षीय दोन महिन्यांच्या तरुणीचा मृत्यू

  • बॉयफ्रेंडने कोल्ड्रिंक्समध्ये डांबर गोळ्या दिल्या मिसळून

  • पोलीस तपास सुरु

मुंबईतील चेंबूर परिसरातून धक्कादायक घटना समोर आली आहे. आरसीएफ गाव परिसरात एका २४ वर्षीय तरुणीचा संशयास्पद मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. धक्कादायक म्हणजे तरुणी २ महिन्यांची गरोदर असल्याचे समोर आले आहे. बॉयफ्रेंडने दुसऱ्या तरुणासोबत प्रेमसंबंध असल्याच्या संशयातून तरुणीला कोल्ड्रिंक्समध्ये डांबर गोळ्या मिसळून दिल्याने तरुणीचा मृत्यू झाला. या प्रकरणी पोलिसांनी तिचा प्रियकर आशिष मगर याला अटक केली असून, त्याला पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मृत तरुणीचे नाव विष्णुमाया असे आहे. ही घटना चेंबूरमधील आरसीएफ गाव परिसरातील म्हैसूर कॉलनीतील बंगला क्रमांक ५७-अ येथे घडली. २५ ते २६ ऑगस्टदरम्यान विष्णुमायाची प्रकृती अचानक बिघडल्याचे समोर आले. ती तिच्या खोलीत बेशुद्धावस्थेत आढळून आली. कुटुंबीयांनी तातडीने तिला रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला.

विष्णुमायाच्या मृत्यूबाबत कुटुंबीयांनी सुरुवातीपासूनच संशय व्यक्त केला. पोलिसांच्या माहितीनुसार, आशिष मगरने सुरुवातीला हा प्रकार नैसर्गिक मृत्यू असल्याचे भासवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे. मात्र पोलिसांनी तपासाची दिशा बदलत तिच्या कुटुंबीयांसह या प्रकरणाशी संबंधित व्यक्तींची चौकशी सुरू केली. घटनास्थळावरील परिस्थिती आणि उपलब्ध पुराव्यांचीही पोलिसांनी तपासणी केली.

तपासादरम्यान पोलिसांना आशिष मगरने विष्णुमायाला ‘थम्स अप’मध्ये डांबर गोळ्या मिसळून दिल्याचा संशय आल्याचे सांगण्यात येत आहे. दुसऱ्या व्यक्तीसोबत तिचे संबंध असल्याच्या संशयातून त्याने हे कृत्य केल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. या प्रकरणाचा तपास आरसीएफ पोलिसांकडून सुरू असून या घटनेचा शोध घेतला जात आहे. पोलिसांकडून उपलब्ध पुरावे, साक्षीदारांचे जबाब आणि इतर बाबींची पडताळणी केली जात आहे. दरम्यान, आशिष मगरला अटक करून न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्याला पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून, तपासातून या प्रकरणातील आणखी तथ्ये समोर येण्याची शक्यता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Deep Vein Thrombosis: एकाच पायाला वारंवार सूज येतेय? 'या' गंभीर आजाराची असू शकते सुरुवात, दुर्लक्ष करू नका

EPFO 3.0 Big Update: PF खातेदारांसाठी मोठी बातमी! EPFO 3.0 मध्ये UPI-ATMसह होणार ५ मोठे बदल; आता झटपट पैसे मिळणार

Maharashtra News Live Update: एकनाथ शिंदे यांचे भाषण सुरू होण्याआधी सभेच्या बाहेर घोषणाबाजी

CM फडणवीसांच्या सचिवांचे बॅनर अन् शिंदेंच्या आमदारांचे कार्यकर्ते संतापले; शिवीगाळ करत थेट जीवे मारण्याची धमकी

Ajwain Water Benefits : रोज २१ दिवस रात्री ओव्याचे पाणी प्या आणि शरीरात होणारा चमत्कार पाहा

SCROLL FOR NEXT