Central Railway VIDEO: ओव्हरहेड वायरच्या बिघाडामुळे मध्य रेल्वेची वाहतूक ठप्प Saam TV
मुंबई/पुणे

Central Railway : मुंबईकरांची लाईफलाईन विस्कळीत, मध्य रेल्वेवर खोळंबा, डाऊन दिशेच्या गाड्या ठप्प

Latest Update Central Railway : गुरूवारी सकाळी मध्य रेल्वेची सेवा विस्कळीत झाली आहे. त्यामुळे नागरिकांना त्रासाचा सामना करावा लागत आहे. मिळालेल्या माहितीनुसार,मध्य रेल्वेवरील लोकल दहा ते १५ मिनिटे उशीराने धावत आहेत.

Namdeo Kumbhar

Mumbai Local : मुंबईकरांची लाईफलाईन गुरुवारी सकाळी ठप्प झाली आहे, त्यामुळे प्रवाशांना त्रासाचा सामना करावा लागत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, टिटवाळा-खडवली या दरम्यान मालगाडीचे कपलिंग तुटले आहे. त्यामुळे मध्य रेल्वेची सेवा विस्कळीत झाली आहे. रेल्वेकडून मालगाडीचे कपलिंग दुरूस्तीचे काम तातडीने करण्यात येत आहे. डाऊन दिशेने जाणाऱ्या सर्व गाड्या ठप्प झाल्याची माहिती मिळत आहे. सोशल मीडियावर प्रवाशांनी आपला राग व्यक्त केला आहे.

गुरुवारी कामावर जाणाऱ्या प्रवाशांना त्रासाचा सामना करावा लागलाय. गर्दीच्या वेळीच मध्य रेल्वेची सेवा विस्कळीत झाल्यामुळे लोकांना कामावर जाण्यास विलंब होत आहे. टिटवाळा-खडवली दरम्यान मालगाडीचे कपलिंग तुटल्याने मध्य रेल्वे विस्कळीत झालेली आहे.त्यामुळे डाऊन मार्गावरच्या सर्वच लोकल गाड्या सध्या पूर्णपणे बंद झाल्या आहेत, त्यावर रेल्वेकडून दुरूस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे. पण प्रवाशांचे मोठे हाल होत आहेत. यामुळे कसाऱ्याहून येणारी “गरीब रथ मेल” आसनगावला जास्तवेळा थांबवण्याची शक्यता आहे.

मध्य रेल्वेची सेवा विस्कळीत झाल्यानंतर सोशल मिडियावर संताप व्यक्त करण्यात येत आहे. लोकल सेवा पाच ते दहा मिनिटे उशीराने सुरू आहे. त्याशिवाय वेगही मंदावला आहे. रेल्वेकडून याबाबतची माहिती दिली जात नाही, त्यामुळे आणखी जास्त त्रासाचा सामना करावा लागत असल्याचे एका युजरने सोशल मिडियावर म्हटलेय.

लोणावळ्यात एक्सप्रेसवर दगडफेक

लोणावळ्यामध्ये एक्सप्रेस ट्रेनवर दगडफेक झाल्याची घटना समोर आली आहे. सोशल मीडियावर एका युजर्सने याबाबत माहिती दिली. आज सकाळी दहा वाजता हैदराबाद मुंबई एक्सप्रेसवर लोणावळा आणि खंडाळा स्टेशनच्या दरम्यान दगडफेक करण्यात आली. प्रवाशांमध्ये यावेळी भीतीचे वातावरण होतं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mhada Flat : 'म्हाडाचे घर' सर्वसामान्यांसाठी 'लुटीचा अड्डा'? कुणी केला गंभीर आरोप, वाचा

L Ganesan death : मृत्यूशी झुंज अपयशी ठरली; राज्यपाल एल. गणेशन यांचं निधन, राजकीय वर्तुळात शोककळा

Woman Threatening: 'तुझे कपडे उतरवून तुला...';पिंक टी-शर्टवाल्या बाईचा भररस्त्यात राडा,व्हिडिओ व्हायरल

Meat Ban Row : दाबा लोकशाहीचं बटन, दाबून खा मच्छी मटण

Human Washing Machine : आता वॉशिंग मशिन माणुसही धुणार; 15 मिनिटांत तुम्ही व्हाल ताजेतवाने, वाचा स्पेशल रिपोर्ट

SCROLL FOR NEXT