Mumbai News Saam Tv
मुंबई/पुणे

Mumbai Local Train : AC लोकलमधून प्रवास करताना तिकीट असूनही भरावा लागेल दंड; नेमकं कारण काय?

Mumbai Local Train News : मुंबईतील एसी लोकलमधील बनावट पास आणि तिकिटांच्या प्रकरणांनंतर रेल्वे प्रशासनाने मोठा निर्णय हाती घेतला आहे. आता पाससोबत आधार किंवा पॅनकार्ड दाखवणे अनिवार्य आहे. यूटीएस अ‍ॅपवरील तिकिटेच वैध मानली जाणार असून ओळखपत्र नसल्यास दंड भरावा लागणार आहे.

Alisha Khedekar

  • एसी लोकलमधून प्रवास करताना तिकीटसोबत ओळखपत्र दाखवणे बंधनकारक

  • फक्त यूटीएस अ‍ॅपवरील पास आणि तिकिटे वैध राहतील

  • प्रिंटेड तिकीटांसाठी ओळखपत्र दाखवणे बंधनकारक

  • मध्य आणि पश्चिम रेल्वेवर मिळून ५ बनावट पास प्रकरणांमध्ये FIR दाखल

  • ओळखपत्र न दाखवल्यास वैध तिकीट असूनही दंड होऊ शकतो

तुम्हीदेखील एसी लोकलमधून प्रवास करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी. मुंबईत मध्य आणि पश्चिम रेल्वेवरील वातानुकूलित (AC) लोकल ट्रेनमधील बनावट तिकिटे आणि पासच्या प्रकरणांनंतर, रेल्वे प्रशासनाने मोठी उपाययोजना हाती घेतली आहे. एसी लोकल ट्रेनमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना आता तिकीट परीक्षकांना (TC) त्यांच्या पाससह त्यांचे ओळखपत्र म्हणजेच आधार कार्ड, पॅनकार्ड दाखवावे लागणार आहे. त्याशिवाय पास किंवा तिकीट ग्राह्य धरले जाणार नाही.

महाव्यवस्थापक विवेक कुमार गुप्ता यांनी या संदर्भात मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना कडक सूचना दिल्या आहेत. गुप्ता यांनी स्पष्ट केले की, फक्त यूटीएस अॅपवर जारी केलेले ऑनलाइन तिकिटे आणि पास वैध असतील. मात्र प्रिंटेड असलेले तिकीट किंवा पाससोबत टीसीला ओळखपत्र दाखवणे बंधनकारक असल्याचे म्हटले.

गुप्ता यांनी काही दिवसांपूर्वी बनावट तिकिटे आणि पासच्या मुद्द्याचा आढावा घेण्यासाठी वरिष्ठ रेल्वे अधिकाऱ्यांची बैठक घेतली. या बैठकीत एआय आणि एडिटिंग सॉफ्टवेअर वापरून बनावट एसी लोकल ट्रेन पास तयार केले जात असल्याचे प्रमाण वाढले असल्याचे उघड झाले.

रेल्वे पोलिस (जीआरपी) स्थानकांवर पाच प्रकरणांमध्ये एफआयआर दाखल करण्यात आले आहेत, ज्यामध्ये मध्य रेल्वेवर तीन आणि पश्चिम रेल्वेवर दोन गुन्हे दाखल आहेत. या फसवणुकींना गांभीर्याने घेत रेल्वे प्रशासनाने कठोर कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे. सर्व टीसींना प्रवाशांचे ओळखपत्र त्यांच्या पाससह तपासणे अनिवार्य असून वैध तिकिट असतानाही, प्रवासादरम्यान प्रवाशांनी ओळखपत्र दाखवले नाही तर दंड आकारला जाईल. असे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

LIC Saral Pension: LIC ची जबरदस्त योजना! एकदा गुंतवणूक करा अन् दर महिन्याला १२००० रुपयांची पेन्शन मिळवा

Traffic Police: ट्राफिक पोलिस सोडून इतर पोलिस वाहनांवर कारवाई करू शकतात का? मंत्र्यांनी स्पष्टच सांगितले

राजकारणात खलबतं! उद्धव ठाकरे विधानसभा अध्यक्षांच्या भेटीला; VIDEO

Bad Cholesterol Food: नसांना चिकटलेला घाणेरडा कोलेस्ट्रेरॉल बाहेर करण्यासाठी हे ४ पदार्थ नक्की खा

विधानसभेतला राडा भोवला, पडळकर अन् आव्हाड समर्थकांना तुरुंगवासाची शिक्षा|VIDEO

SCROLL FOR NEXT