msrtc bus caught fire near karnala saam tv
मुंबई/पुणे

Mumbai Goa Highway: मुंबई सेंट्रल- महाड बस जळून खाक; प्रवासी सुखरुप

या अपघातामुळे मुंबई - गोवा महामार्गावरील गोव्याच्या दिशेने जाणारा रस्ता बंद करण्यात आला होता.

साम न्यूज नेटवर्क

- सिद्धेश म्हात्रे

नवी मुंबई : मुंबई सेंट्रलहून (mumbai central) महाडला (mahad) जाणारी राज्य परिवहन महामंडळाची बस (msrtc bus) अचानक मुंबई - गोवा महामार्गावर (mumbai goa highway) कर्नाळा अभयारण्यच्या पुढे पेटली. ही गाेष्ट चालकाच्या लक्षात आल्यानंतर त्याने सर्व (५२) प्रवाशांना बसमधून खाली उतरवले. या घटनेत सर्व प्रवासी सुरक्षित असून संपुर्ण बस मात्र जळून खाक झाली आहे. (mumbai goa highway latest marathi news)

मुंबई सेंट्रल येथून महाडला (एमएच १४ बीटी २०५६) ही बस निघाली हाेती. या बसला आज (शुक्रवार) सकाळी सव्वा नऊ वाजता मुंबई - गोवा महामार्गावर कर्नाळा अभयारण्यच्या पुढे अचानक आग लागली. बसच्या समोरील बाजूकडून धूर आल्याने आग लागल्याचे चालकाच्या लक्षात आले. त्याने प्रसंगावधान राखत तात्कळ बस थांबवून प्रवाशांना बाहेर काढले.

दरम्यान आग भडकल्याने प्रवाशांसह वाहकाचे सर्व सामान जाळून खाक झाले. अग्निशमन दलाच्या (fire brigade) जवानांनी घटनास्थळी पाेहचून आग विझविण्यासाठी प्रयत्न केले मात्र बस जळून खाक झाली हाेती. या अपघातामुळे मुंबई - गोवा महामार्गावरील गोव्याच्या (goa) दिशेने जाणारा रस्ता बंद करण्यात आला होता. या महामार्गावर तात्पूरत्या स्वरुपात एकेरी वाहतूक सुरु केल्याने मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IND vs IRE: बेलफास्टमध्ये टीम इंडियाचा सुफडासाफ; आयर्लंडचा ऐतिहासिक विजय

केतन अग्रवाल हत्या प्रकरण नवी अपडेट: पोलिसांच्या नजरेतून वाचण्यासाठी चेतनने लढवली होती अनोखी शक्कल

Ben Stokes : भारत-इंग्लंडच्या सामन्यांआधी मोठी बातमी! दिग्गज क्रिकेटपटूची तडकाफडकी रिटायरमेंट, क्रिडाविश्वात खळबळ

Maharashtra News Live Update: बालबेडा जंगलात माओवाद्यांचा शस्त्रनिर्मिती कारखाना उद्ध्वस्त; पोलीस-सीआरपीएफची मोठी कारवाई

१,४०० किलोमीटर लांबी, ८ लेन; महाराष्ट्रासह पाच राज्यांना जोडणार द्रुतगती मार्ग, जाणून घ्या महामार्गाचे वैशिष्ट्ये

SCROLL FOR NEXT