Mumbai Local Train Updates Saam tv
मुंबई/पुणे

Mumbai Local Train : मुंबईला मुसळधार पावसाने झोडपले, मध्य रेल्वेची वाहतूक कोलमडली; लोकलच्या अनेक फेऱ्या रद्द

MUmbai Local Train News : रेल्वे ट्रॅकवर पाणी साचल्याने अनेक लोकल ट्रेनच्या अनेक फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. त्यामुळे सोमवारी पहाटे कामावर निघालेल्या नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे.

Satish Daud

मुंबई आणि उपनगरात रविवारी मध्यरात्रीपासूनच मुसळधार पाऊस सुरू आहे. यामुळे सखल भागात पाणी शिरलं असून वाहतुकीवर मोठा परिणाम झाला आहे. रेल्वे ट्रॅकवर पाणी साचल्याने अनेक लोकल ट्रेनच्या अनेक फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. त्यामुळे सोमवारी पहाटे कामावर निघालेल्या नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे.

दादर, माटुंगा, भांडूप, अंधेरी, कुर्ला परिसरातील रेल्वे ट्रॅकवर मोठ्या प्रमाणात पाणी साचलं आहे. हार्बर मार्गावरील एलटीटी आणि चुनाभट्टी स्थानकावरही पाणी साचलं आहे. मुसळधार पावसाचा परिणाम मध्य आणि हार्बर रेल्वेवर झाला आहे.

कल्याणहून सीएसएमटीच्या दिशेने येणाऱ्या लोकल गाड्या ठप्प झाल्या आहेत. तसेच ठाण्याहून वाशीकडे जाणाऱ्या लोकल ट्रेन पूर्णत: ठप्प आहेत. दुसरीकडे लांब पल्ल्याच्या गाड्या देखील रद्द करण्यात आल्याची माहिती आहे. यामुळे स्थानकांवर प्रवाशांची मोठी गर्दी दिसून येत आहे.

रेल्वे प्रशासनाकडून सध्या वाहतूक सुरळीत करण्याचं काम सुरू आहे. प्रवाशांनी संयम बाळगावा, असं आवाहन करण्यात आलं आहे. मुसळधार पावसाचा फटका लांब पल्ल्याच्या रेल्वेगाड्यांना देखील बसला आहे. मनमाड येथून मुंबईकडे येणारी पंचवटी एक्सप्रेस रद्द करण्यात आली आहे.

तर पुण्याहून मुंबईकडे येणारी सिंहगड एक्सप्रेस आणि डेक्कन क्वीन एक्स्प्रेस देखील वाहतूक रद्द करण्यात आली आहे. सध्या हळूहळू लोकलसेवा सुरू होत आहे. त्यामुळे स्थानकांवरील गर्दी कमी होत आहे.

दरम्यान, पावसामुळे इस्टर्न आणि वेस्टर्न एक्स्प्रेस वेवर देखील मोठी वाहतूक कोंडी झाली आहे. अंधेरी सबवे, वडाळा, शिवडी इथं पाणी साचल्यामुळं नोकरीसाठी म्हणून घराबाहेर पडलेल्या नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली आहे.

त्यामुळे नागरिकांनी काम असेल तरच घराबाहेर पडावं. तसेच वाहतुकीची व्यवस्था लक्षात घेत त्यानुसारच प्रवासाचं नियोजन करण्याचं आवाहन प्रशासनानं केलं आहे. काहींनी रस्ते मार्गानं अपेक्षित स्थळी पोहोचण्यासाठीचे प्रयत्न सुरु केल्यामुळं एकच गोंधळ माजल्याचं पाहायला मिळत आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Palghar Tourism : समुद्रकिनारी उभा असलेला पालघरमधील 'हा' भव्य ऐतिहासिक किल्ला, देतोय मराठ्यांच्या शौर्याची साक्ष

Famous Actor Death : तेजस्वी तारा हरपला; ज्येष्ठ अभिनेत्याचे निधन, मनोरंजन विश्वावर शोककळा

पुण्यात काँग्रेसच्या बड्या नेत्याच्या कारचा भीषण अपघात; खासगी रुग्णालयात उपचार सुरू

8th Pay Commission: सरकारी कर्मचाऱ्यांना लॉटरी लागणार! आठव्या वेतन आयोगात पगारवाढीचा फॉर्म्युला बदलणार?

Maharashtra News Live Update: आसाममध्ये सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार यांचे भव्य स्वागत

SCROLL FOR NEXT