CAG Mumbai, Fake degree scam  
मुंबई/पुणे

Mumbai : मुंबईतील धक्कादायक प्रकार, बोगस पदवीने मिळवली सरकारी नोकरी, असं उघड पडलं पितळ

CAG Mumbai, Fake degree scam : मुंबईतील CAG कार्यालयात बनावट बी.कॉम. पदवीच्या आधारे सरकारी नोकरी मिळवल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. विद्यापीठाच्या पडताळणीत फसवणूक समोर आले.

Namdeo Kumbhar

संजय गडदे, मुंबई प्रतिनिधी

Mumbai fake degree government job case : देशाच्या आर्थिक व्यवहारांचे लेखापरीक्षण करणाऱ्या 'भारताचे नियंत्रक आणि महालेखापरीक्षक' (CAG) यांच्या मुंबई कार्यालयात फसवणुकीचा एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. बनावट बी.कॉम. पदवीच्या आधारे एका तरुणाने केंद्र सरकारमध्ये लेखापरीक्षक (ऑडिटर) म्हणून नोकरी मिळवली आणि तब्बल १४ महिने सरकारी वेतनही लाटले. मात्र, शैक्षणिक पदवीच्या पडताळणीदरम्यान हे सत्य समोर आल्यानंतर संबंधित कर्मचाऱ्याला सेवेतून बडतर्फ करण्यात आले असून, त्याच्याविरुद्ध आझाद मैदान पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सुखदेव शिवाजी पाटील (वय २७) याने ८ नोव्हेंबर २०२४ रोजी क्रीडा कोट्यातून (Sports Quota) मुंबईतील प्रधान महालेखापाल (ऑडिट)-१ कार्यालयात लेखापरीक्षक म्हणून नोकरी मिळवली होती. या नोकरीसाठी त्याने हिमाचल प्रदेशातील 'आर्णी विद्यापीठा'ची बी.कॉम.ची पदवी सादर केली होती.

संबंधित पदवीबाबत संशय आल्याने वरिष्ठ लेखापरीक्षण अधिकाऱ्यांनी विद्यापीठाकडे पडताळणीसाठी पत्र पाठवले. त्यावर उत्तर देताना, "संबंधित नोंदणी क्रमांक (Registration Number) आमच्या कोणत्याही विद्यार्थ्याचा नसून, सुखदेव शिवाजी पाटील नावाचा विद्यार्थी या विद्यापीठात कधीही शिकलेला नाही," असे विद्यापीठाने स्पष्ट केले.

हा अहवाल प्राप्त होताच विभागाने ३१ डिसेंबर २०२५ रोजी संबंधित कर्मचाऱ्याला 'कारणे दाखवा नोटीस' बजावली. आरोपीने कागदपत्रांची दुरुस्ती करण्यासाठी ६० दिवसांची मुदत मागितली होती; मात्र विभागाने त्याचा दावा फेटाळून लावत ७ जानेवारी २०२६ रोजी त्याला सेवेतून बडतर्फ केले.

या प्रकरणी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या तक्रारीवरून २० जुलै २०२६ रोजी आझाद मैदान पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस सध्या या फसवणुकीचा पुढील तपास करत असून, आरोपीने १४ महिन्यांत उचललेल्या वेतनाची वसुली करण्याची प्रक्रियाही विभागाने सुरू केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: कोकण-घाटमाथ्यावर मुसळधार पावसाचा इशारा

Manoj Jarange : मनोज जरांगेंच्या संतापाचा उद्रेक; शिंदे-फडणवीसांचं नाव घेत दिला निर्वाणीचा इशारा

माजी उपमुख्यमंत्र्यांवर हल्ला करणारा कोण? पहिला व्हिडिओ आला समोर; फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश

Chandrashekhar Bawankule: माझी बायको पण कुणबी, माझ्या व्यंगावर बोलून...; जरांगेंच्या टीकेला उत्तर देताना बावनकुळे भावुक

Manjar Marathi Movie: घरभर पसारा अन् तीन मित्रांची धमाल; 'मांजर'लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

SCROLL FOR NEXT