Sushil Kedia retweets tagging Chief Minister Devendra Fadnavis Saam Tv News
मुंबई/पुणे

Sushil Kedia Tweet : महाराष्ट्र जोपर्यंत देवेंद्र फडणवीसांच्या हातात आहे, तोपर्यंत...' सुशील केडिया यांचं फडणवीसांना टॅग करत ट्वीट

Sushil Kedia New Tweet : सुशील केडियाने राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना टॅग करत ट्वीटमध्ये म्हटलं आहे की, 'जोवर महाराष्ट्र आणि महाराष्ट्राचं प्रशासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हातात आहे, तोवर निश्चिंत राहा'.

Prashant Patil

मुंबई : राज्यात महिन्याभरापासून त्रिभाषा धोरणावरून निर्माण झालेला मराठी भाषेचा मुद्दा चांगलाच तापलाय. यानंतर काल व्यावसायिक सुशील केडियाने मराठी भाषेवरून राज ठाकरेंना ओपन चॅलेंज दिलं होतं. यानंतर मनसैनिकांनी त्यांचं ऑफिस फोडलं. दरम्यान, आज केडियाने राज ठाकरेंची जाहीर माफी मागितली आहे. व्हिडिओ शूट करून त्यांनी मराठी भाषा अतिशय चांगल्या पद्धतीने शिकणार असल्याचं सांगितलं. याचदरम्यान, सुशील केडिया याने चक्क राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना टॅग करत पुन्हा एक ट्वीट केलं आहे. त्यात तो नेमकं काय म्हणाला आहेत ते पाहूया.

काल व्यावसायिक सुशील केडियाने मराठी भाषेवरून राज ठाकरेंना ओपन चॅलेंज दिलं होतं. यानंतर मनसैनिकांनी त्यांचं ऑफिस फोडलं. दरम्यान, आज केडियाने राज ठाकरेंची जाहीर माफी मागितली आहे. सुशील केडियाने राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना टॅग करत ट्वीटमध्ये म्हटलं आहे की, 'जोवर महाराष्ट्र आणि महाराष्ट्राचं प्रशासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हातात आहे, तोवर निश्चिंत राहा. ते आहेत तोपर्यंत कुणावर अत्याचार होणार नाही. न्यायव्यवस्था पूर्णपणे सगळ्यांना एकच न्याय आणि व्यवस्थित ठेवेन', असं सुशील केडियाने म्हटलं आहे.

सुशील केडिया नेमकं काय म्हणाला?

'माझी चूक मला मान्य आहे. त्याबाबत मी खेद व्यक्त करत आहे. मी माफी मागतो. मला माफ करा, माझे वक्तव्य मागे घेतो. लवकरच मी मराठी भाषा अतिशय चांगल्या पद्धतीने शिकेल. हे बिघडलेले वातावरण नीट करा. माझी चूक मला समजली आहे. ती सुधारू इच्छितो. ते ट्विट मी तणाव आणि दडपणाखाली केले आहे', असं सुशील केडिया म्हणाला.

केडिया याने व्हिडिओ ट्विट राज ठाकरेंची माफी मागितली. 'नमस्कार, स्ट्रेसमध्ये असल्याकारणाने मी काल एक वक्तव्य केलं होतं. सध्या माझ्या वक्तव्यावर वादंग निर्माण झालं आहे. ज्यांना मराठी येत नाही, त्यांनी केलेल्या हिंसाचारावर मी ओव्हररिएक्ट झालो. मला माझी चूक उमगली. मी माझे शब्द मागे घेत आहे', असं केडिया म्हणाला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

GST Discount: दसऱ्याला घरी आणा कार; GST कपातीनंतर टाटाच्या या कारवर धमाकेदार डिस्काउंट, जाणून घ्या फीचर्स आणि किंमत

OBC Reservation: 'डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी राजीनामा दिला होता, भुजबळ आणि मुंडे OBC साठी मंत्रिपद कधी सोडणार?

Maharashtra Live News Update: मुंबई गोवा महामार्गावर धावत्या कारला लागली आग

Police Death : नवी मुंबईत पोलीस कर्मचाऱ्याची आत्महत्या; पत्नीशी वादानंतर घरात आयुष्य संपवलं

Potato Recipe : बटाट्याला द्या चटपटीत ट्विस्ट, फक्त १० मिनिटांत बनवा 'ही' प्रसिद्ध चाट रेसिपी

SCROLL FOR NEXT