Mumbai Model Rape Case: Businessman Gets Anticipatory Bail From Dindoshi Court 
मुंबई/पुणे

प्रसिद्ध मॉडेल बलात्कार प्रकरणात मुंबईतील उद्योजकाला दिलासा; न्यायालयाकडून अटकपूर्व जामीन मंजूर

Mumbai Entrepreneur Grants Bail: मुंबईतील प्रसिद्ध मॉडेलने दाखल केलेल्या बलात्काराच्या गुन्ह्यात उद्योजकाला दिंडोशी सत्र न्यायालयाने २५ हजार रुपयांच्या बाँडवर अटकपूर्व जामीन मंजूर केला. या निर्णयामुळे उद्योजकाला दिलासा मिळाला आहे.

Ganesh Kavade

  • मुंबईतील प्रसिद्ध मॉडेल बलात्कार प्रकरणात उद्योजकाला जामीन

  • दिंडोशी सत्र न्यायालयाचा अटकपूर्व जामिनाबाबत मोठा निर्णय

  • मॉडेलच्या बलात्काराच्या तक्रारीनंतर उद्योजकाला न्यायालयाचा दिलासा

मुंबईतील एका प्रसिद्ध मॉडेलने दाखल केलेल्या बलात्काराच्या गुन्ह्यात उद्योजकाला मोठा दिलासा मिळालाय. दिंडोशी सत्र न्यायालयाने त्यांना २५ हजार रुपयांच्या बाँडवर अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे. मात्र, या प्रकरणात न्यायालयाने काही महत्त्वाच्या अटी घातल्या आहेत. मॉडेलच्या तक्रारीनुसार उद्योजकाविरोधात वर्सोवा पोलीस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

या प्रकरणात उद्योजकाच्या वतीने मुंबई उच्च न्यायालयातील वकील सिद्धार्थ अग्रवाल यांनी न्यायालयात बाजू मांडली. न्यायालयात बाजू मांडताना वकील सिद्धार्थ अग्रवाल यांनी संबंधित मॉडेलने जाणीवपूर्वक ब्लॅकमेलिंगच्या उद्देशाने विविध गुन्हे दाखल केल्याचा युक्तिवाद केला.

न्यायालयाने घातल्या महत्त्वाच्या अटी

दिंडोशी सत्र न्यायालयाने बलात्काराच्या गुन्ह्यात उद्योजकाला २५ हजार रुपयांच्या बाँडवर अटकपूर्व जामीन मंजूर केला. मात्र जामीन मंजूर करताना न्यायालयाने काही अटी घातल्या आहेत. उद्योजकाला देश सोडून जाता येणार नाही.

पीडितेला किंवा साक्षीदारांना धमकावता येणार नाही.

न्यायालयाने घातलेल्या अटींचे पालन करणे बंधनकारक असेल.

दरम्यान, उद्योजकाने दाखल केलेल्या खंडणीच्या गुन्ह्यात संबंधित मॉडेलला अद्याप न्यायालयाकडून दिलासा मिळालेला नाही. त्यामुळे या प्रकरणातील पुढील घडामोडींकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

हनीट्रॅपमध्ये अडकवून कोट्यवधींची खंडणी घेतल्याचा आरोप

संबंधित मॉडेलने खोटे गुन्हे दाखल करून आपल्याला हनीट्रॅपमध्ये अडकवले. त्यानंतर कोट्यवधी रुपयांची खंडणी वसूल केल्याचा दावा उद्योजकाने केला होता. मॉडेलने बलात्कार, पाठलाग करणे आणि स्टॉकिंग यांसारखे वेगवेगळे गुन्हे दाखल करून आपल्याला ब्लॅकमेल केल्याचा आरोपही त्यांनी केला.

आलिशान फ्लॅट, एमजी हेक्टर कार आणि परदेश दौऱ्यांचा आरोप

व्यावसायिकाने मॉडेलविरोधात गंभीर आरोप केले आहेत. मॉडेलने ब्लॅकमेलिंग करून आलिशान फ्लॅट, एमजी हेक्टर कार आणि अनेक स्थावर मालमत्ता मिळवल्याचा दावा केलाय. तसेच आपल्या पैशातून मॉडेलनं स्वतःचे परदेश दौरे केले असा आरोप करण्यात आलाय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sleep Health : पूर्ण झोप घेऊनही सकाळी थकवा जाणवतोय? ही आहेत 6 धक्कादायक कारणे!

मराठा आरक्षणाच्या लढ्यात नवा ट्विस्ट! विखे पाटलांसह मनोज जरांगेंनाही घेरलं; थेट राजीनामा...

Maharashtra News Live Update: पुणे शहरातील अमेझॉन , बिग बास्केट, डार्क स्टोरवर एफडीएची धडक कारवाई

Heath Tips : तोंडातून दुर्गंधी येतेय, किडनीशी काय आहे संबंध?

NEET पेपरफुटी प्रकरण: १४ आरोपींविरुद्ध आरोप निश्चित; २५ नोव्हेंबरपासून सुनावणी होणार सुरू

SCROLL FOR NEXT