Mumbai Local Accident Saam Tv
मुंबई/पुणे

Mumbai Local: मुंबईत धावत्या लोकलमधून पडून प्रसिद्ध व्यावसायिकाचा मृत्यू, मुंलुंड रेल्वे स्थानकावर अपघाताचा थरार

Mumbai Local Accident: मुंबईतल्या मुलुंड रेल्वे स्थानकावर रेल्वे अपघातामध्ये व्यावसायिकाचा मृत्यू झाला. लोकलमध्ये चढताना व्यावसायिक खाली पडले. या अपघातामध्ये त्यांचे पाय तुटले. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

Priya More

Summary -

  • मुंबईत धावत्या लोकलमधून पडून प्रसिद्ध व्यावसायिकाचा मृत्यू

  • मुलुंड रेल्वे स्थानकावर घडली घटना

  • ७१ वर्षीय व्यावसायिक किर्ती वीरा अपघातात गंभीर जखमी झाले होते

  • उपचारादरम्यान फोर्टिस रुग्णालयात त्यांचा मृत्यू झाला

मुंबईमध्ये धावत्या लोकलमधून पडून एका प्रसिद्ध व्यावसायिकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली. मुलुंड रेल्वे स्थानकावर ९ एप्रिल रोजी ही घटना घडली होती. या अपघातामध्ये जखमी झालेल्या व्यावसायिकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. किर्ती वीरा असे या ७१ वर्षीय मृत व्यावसायिकाचे नाव होते. या घटनेमुळे मुंबईत एकच खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ९ एप्रिल रोजी सायंकाळी साडेपाच वाजताच्या सुमारास ही घटना घडली होती. मुलुंड रेल्वे स्थानकावर धावत्या लोकलमध्ये चढताना किर्ती वीरा खाली पडले. त्यानंतर ते लोकलसोबत फरफरट गेले. या अपघातामध्ये त्यांचे पाय तुटले. गंभीर जखमी अवस्थेत त्यांना तातकडीने अग्रवाल रुग्णालयात दाखल करण्यात आले.

किर्ती ओरा यांची प्रकृती गंभीर होती. प्राथमिक उपचारानंतर त्यांना पुढील उपचारासाठी मुंबईतील फोर्टिस रुग्णालयात हलवण्यात आले. पण त्याठिकाणी उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. किर्ती वीरा हे मुलुंड पश्चिम येथील प्रसिद्ध व्यावसायिक होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

त्याने आमचं ऐकलं नाही; टायगर श्रॉफवरील गोळीबारानंतर 'अनिल' नावाची पोस्ट व्हायरल

Tiger Shroff Firing Video: दोन सेकंदात ५ राउंड; अभिनेता टायगर श्रॉफवरील गोळीबाराचा व्हिडिओ आला समोर

Maharashtra News Live Update: मुख्यमंत्री फडणवीस ॲक्शन मोडमध्ये! टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरणी पोलिस आयुक्तांना फोन

टायगर श्रॉफवर ५ राऊंड फायर, गोळीबार प्रकरणात मोठी अपडेट; बॉलीवूड हादरलं | VIDEO

मोठी बातमी! अभिनेता टायगर श्रॉफवर अज्ञातांकडून गोळीबार

SCROLL FOR NEXT