CBI Action In Mumbai  Saam tv
मुंबई/पुणे

Mumbai News: सीबीआयची मुंबईत मोठी कारवाई! सेंट्रल जीएसटी अधीक्षकासह दोघांना अटक, प्रकरण काय?

CBI Action In Mumbai: सीजीएसटीकडे असलेल्या एका प्रकरणात कारवाई न करण्यासाठी तक्रारदाराकडून या अधिकाऱ्यांनी तब्बल ६० लाखांची मागणी केल्याचे तपासात समोर आले आहे.

Gangappa Pujari

मुंबई, ता. ८ सप्टेंबर २०२४

CBI Raid In Mumbai: केंद्रीय अन्वेषण विभागाने मुंबईमध्ये मोठी कारवाई केली आहे. सीबीआयने मुंबईमध्ये सीजीएसटीच्या लाचखोर अधीक्षकासह आणखी दोघांच्या मुसक्या आवळल्या आहेत. ६० लाख रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी ही मोठी कारवाई करण्यात आली आहे. सीबीआयच्या या मोठ्या कारवाईने सर्वत्र खळबळ उडाली आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, केंद्रीय अन्वेषण विभागाच्या टीमने मुंबईमध्ये मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत सीबीआयने सीजीएसटी (अँटी इव्हेशन) अधीक्षकासह 3 आरोपींना आणि दोन खाजगी व्यक्तींना 60 लाख रुपयांची लाच घेतल्याप्रकरणी अटक केली आहे. ६० लाखांपैकी २० लाखांची लाच घेतानाच रंगेहात पकडण्यात आले असून याप्रकरणात तब्बल सात अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सीजीएसटीकडे असलेल्या एका प्रकरणात कारवाई न करण्यासाठी तक्रारदाराकडून या अधिकाऱ्यांनी तब्बल ६० लाखांची मागणी केल्याचे तपासात समोर आले आहे. यामधील ३० लाख रुपये हवालामार्फत देण्यात आल्याचे सीबीआयने म्हटले आहे. या कारवाईमध्ये सीजीएसटीचे अतिरिक्त सह आयुक्त, सीजीएसटी आयुक्त, 4 अधीक्षक, 2 सनदी लेखापालासह एका खासगी व्यक्तींचा सहभाग आहे. दरम्यान, या सर्वांना सीबीआयच्या विशेष न्यायालयाने 10 सप्टेंबरपर्यंत कोठडी सुनावली आहे.

दुसरीकडे विरोधी पक्षनेते असताना देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र विधीमंडळात सादर केलेल्या पेन ड्राईव्हवरुन सीबीआयने आता माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यासह सरकारी वकील प्रविण चव्हाण, पुण्यातील तत्कालीन पोलीस उपायुक्त पोर्णिमा गायकवाड निवृत्त सहायक पोलीस आयुक्त सुषमा चव्हाण विजय पाटील यांच्याविरुद्ध कट कारस्थान करण्याचा गुन्हा दाखल केला आहे. देवेंद्र फडणवीस यांनी भारतीय जनता पक्षांच्या नेत्यांना खोट्या गुन्ह्यात अडकविण्याचा प्रयत्न सरकारकडून केला जात असल्याचा आरोप केला होता. याच प्रकरणात ही कारवाई करण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

डेंग्यूच्या आजाराचा डास कसा ओळखाल?

वेताळवाडी किल्ल्यावर टोळक्यांची हुल्लडबाजी, पंचधातूची तोफ कोसळली, एक जण जखमी

Kiku Sharda: मी नेहमी शोसोबत...; द ग्रेट इंडियन कपिल शो सोडण्याबाबत किकू शारदाने व्यक्त केल्या भावना, म्हणाला...

Anant Chaturdashi 2025 live updates : लालबागचा राजा मंडपातून बाहेर; फुलांचा वर्षाव करत मानवंदना; VIDEO

Maharashtra Live News Update: पुण्यातील दगडूशेठ गणपती मिरवणुकीच्या रथाला आकर्षक रोषणाई

SCROLL FOR NEXT