Kalyan Latest News Saamtv
मुंबई/पुणे

Kalyan News: वरिष्ठांच्या जाचाला कंटाळून उचलले टोकाचे पाऊल? सहायक लोको पायलटची आत्महत्या; परिसरात खळबळ

Kalyan Latest News: घटनेनंतर संतप्त सहायक लोको पायलट अधिकाऱ्यांनी कल्याणच्या (Kalyan) मोटरमन कार्यालयात गोंधल घातला.

Gangappa Pujari

अभिजित देखमुख, प्रतिनिधी...

Kalyan News: कल्याणमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. कल्याणमध्ये सहायक लोको पायलटने राहत्या घरी आत्महत्या केल्याने एकच खळबळ उडाली आहे. सुजित कुमार जयंत असे या पायलटचे नाव असून वरिष्ठांच्या जाचाला कंंटाळून जीवन संपवल्याचा आरोप कुटूंबियांनी केला.

याबाबत अधिक माहिती अशी की, सहायक लोकोपायलटच्या आत्महत्येने कल्याणमध्ये (Kalyan) खळबळ उडाली आहे. कोळसेवाडीतील (Kolasewadi) आपल्या राहत्या घरी असताना सुजित कुमार जयंत (Sujit Kumar Jayant) या तरुणाने हे टोकाचे पाऊल उचलले.

या प्रकरणात वरिष्ठांच्या जाचाला कंटाळून सुजित यांनी आत्महत्या केल्याचा आरोप त्यांच्या सहकार्यांनी केला आहे. गेल्या तीन महिन्यांपासून सुजितची गैरहजेरी लावण्यात लावण्यात आली तसेच सप्टेंबर महिन्यात देखील त्याची गैरहजेरी लावण्यात आली होती, याच जाचाला कंटाळून आत्महत्या केल्याचे सहकार्यांनी म्हणले आहे.

घटनेनंतर संतप्त सहायक लोको पायलट अधिकाऱ्यांनी कल्याणच्या (Kalyan) मोटरमन कार्यालयात गोंधल घातला. संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यावर जोपर्यंत कारवाई होत नाही तोपर्यंत आम्ही हटणार नाही. अशी भूमिका घेतल्याने परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले. ज्यानंतर मोटरमन कार्यालय परिसरात प्रचंड पोलीस (Police) आणी आरपीएफ (RPF) बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Beed Crime: धक्कादायक! ओळखीनं केला घात; बॉक्समध्ये आढळला बेपत्ता होमगार्ड महिलेचा मृतदेह

Bull Beauty Parlour: नंदुरबारमध्ये बैलांचं ब्युटी पार्लर

Raj Thackeray Meeting Devendra Fadnavis: बेस्ट पराभवानंतर अवघ्या २४ तासात राज ठाकरे फडणवीसांच्या भेटीला चर्चांना उधाण

Sunetra Pawar: सुनेत्रा पवारांचं संघ दक्ष, RSS च्या बैठकीला सुनेत्रा पवारांची हजेरी? कंगनाच्या घरी काय घडलं?

IT Job Crisis: आयटी क्षेत्रात नोकर कपात; 80 हजार कर्मचाऱ्यांना दिला नारळ

SCROLL FOR NEXT