Mumbai News Saam Tv
मुंबई/पुणे

Mumbai : मुंबईतील स्टेशनवर बेवारस बॅगेत सापडलं लाखोंचं घबाड, पैसे नेमके कुणाचे? पोलिसांना समजताच...

Mumbai Police News : बोरीवली स्टेशनवर बेवारस बॅग सापडल्याने काही काळ भीतीचं वातावरण पसरलं होतं. तपासात ५० ग्रॅम सोनं व ₹७.५० लाख रुपये आढळले. मुंबई पोलिसांनी ती बॅग सुरक्षितपणे मालकाकडे परत केली.

Alisha Khedekar

  • बोरीवली स्टेशनवर बेवारस बॅग सापडून एकच खळबळ

  • बॅगमध्ये सोनं व मोठी रोकड असल्याचे समोर

  • पोलिसांनी तत्परतेने बॅगची ओळख पटवून मालकाकडे परत केली

  • प्रामाणिक कारवाईमुळे नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला

संजय गडदे, मुंबई

मुंबईतील बोरीवली येथून मोठी बातमी समोर आली आहे. बोरिवली पूर्व रेल्वे स्टेशनच्या बाहेर सोमवारी सकाळी एक बेवारस बॅग आढळून आल्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली. संशयास्पद बॅग दिसताच नागरिकांनी पोलिसांना माहिती दिली. बेवारस बॅग असल्याने काही काळ स्टेशन परिसरात भितीचं वातावरण निर्माण झालं होतं.

कस्तुरबा मार्ग पोलीस स्टेशनला माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक जयराज रणवरे यांच्या मार्गदर्शनाखाली ATC अधिकारी API युवराज इनामदार आणि त्यांच्या पथकाने त्वरित घटनास्थळी धाव घेतली. सर्वप्रथम परिसर सुरक्षित करून बॅगची तपासणी सुरू करण्यात आली. तपासात सुटकेसमध्ये ५० ग्रॅम सोनं आणि तब्बल ₹७,५०,००० रोख रक्कम आढळून आली.

पुढील चौकशीत ही बॅग प्रदीप नानुबाई जोशी (वय ७० वर्षे), मूळचे वडोदरा - गुजरात यांची असल्याचे स्पष्ट झाले. ते पोईसर, कांदिवली येथील लग्नसमारंभाला आले असताना चुकून ही बॅग बोरीवली स्टेशनबाहेर विसरून गेले होते. त्यांना बॅग हरवल्याची जाणीवही नव्हती. पोलिसांनी संपर्क साधल्यानंतर जोशी यांनी स्टेशनवर येऊन आपल्या बागेची ओळख पटवली. त्यानंतर कस्तुरबा पोलिसांनी ५० ग्रॅम सोनं आणि ₹७.५० लाख रोख रक्कम सुरक्षित स्वरूपात त्यांच्याकडे सुपूर्द केली.

ननुबाई जोशी यांनी कस्तुरबा मार्ग पोलीस स्टेशनचे मनापासून आभार मानत सांगितले की, “आजच्या काळात इतक्या मोठ्या रकमेची व सोन्याची बॅग सुरक्षित परत मिळणे म्हणजे पोलिसांची प्रामाणिकता आणि तत्परता यांचा उत्तम नमुना आहे.” घटनेमुळे काही काळ परिसरात तणाव आणि भिती निर्माण झाली होती, मात्र कस्तुरबा पोलिसांच्या वेगवान व व्यावसायिक कारवाईमुळे नागरिकांनी सुटकेचा निःश्वास सोडला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

PF खात्यातून पैसे काढणं झालं सोपं; UPIमधून किती आणि कधी काढू शकणार पैसे? जाणून घ्या संपूर्ण माहिती

Badami Heritage: स्वर्गाहून सुंदर! कमी बजेटमध्ये मुंबई–पुण्याला फिरणं सोडा, विकेंडला करा बदामी ट्रिप प्लान

Crime News : परदेशात गलेलठ्ठ पगाराचं प्रलोभन, कंपनीत नको ते करायला लावलं; ४ महिने अगणित छळ, कोकणातील तरुणासोबत भयंकर घडलं

महाराष्ट्राच्या शेजारच्या राज्यात 4 तासांत एकापाठोपाठ 9 भूकंपाचे धक्के; लोकांमध्ये भीतीचं वातावरण

Himachal Pradesh bus accident : खासगी बस दरीत कोसळली, ८ जणांचा मृत्यू; अनेक प्रवासी जखमी

SCROLL FOR NEXT