Mumbai Boat Accident Update Saam Tv
मुंबई/पुणे

Mumbai Boat Accident: नियतीने केला घात! आईविना मुलं झाली पोरकी, बोट दुर्घटनेत नेरूळच्या महिलेचा मृत्यू

Boat Accident Update: नवी मुंबईच्या नेरूळ येथे राहणाऱ्या प्रज्ञा कांबळे यांचा एलिफंटा बोट दुर्घटनेमध्ये मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूमुळे हसत्या खेळत्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला.

Priya More

सिद्धेश म्हात्रे, नवी मुंबई

मुंबईतल्या गेट वे ऑफ इंडिया येथून एलिफंटाला जाणाऱ्या प्रवासी बोटला नौदलाच्या स्पीड बोटने धडक दिल्याची दुर्घटना बुधवारी घडली. या दुर्घटनेमध्ये आतापर्यंत १३ जणांचा मृत्यू झाला तर दोघे जण अद्यापही बेपत्ता आहेत. या दोघांचा शोध घेतला जात आहे. या दुर्घटनेमध्ये अनेक कुटुंब उद्ध्वस्त झाली.

नवी मुंबईच्या नेरूळ येथे राहणाऱ्या प्रज्ञा कांबळे यांचा या दुर्घटनेमध्ये मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूमुळे हसत्या खेळत्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला. आईच्या मृत्यूमुळे प्रज्ञा यांची दोन मुलं पोरकी झाली आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, एलिफंटा बोट दुर्घटनेत नेरूळ येथे राहणाऱ्या प्रज्ञा कांबळे यांचा दुर्देवी मृत्यू झाला. त्यांच्यावर नेरूळ येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. प्रज्ञा कांबळे यांना एक मुलगा आणि एक मुलगी असून दोघेही शिक्षण घेत आहेत. प्रज्ञा कांबळे या मिळेल ती कामं करून आपल्या दोन मुलांचे शिक्षण करत घर चालवत होत्या. मात्र आता त्यांचा मृत्यू झाल्याने दोन्ही मुलं पोरकी झाली आहेत.

प्रज्ञा यांचा मुलगा १२ वीला तर मुलगी ९ वीमध्ये शिकत आहेत. आईविना ही दोन्ही मुलं पोरकी झाली आहेत. प्रज्ञा यांच्या मृत्यूची माहिती कळताच त्यांच्या दोन्ही मुलांना मोठा धक्का बसला. रडून रडून या मुलं बेहाल झाले आहेत. घरातील एकट्या कमावत्या व्यक्तीचे निधन झाल्यामुळे आता या दोन मुलांचा सांभाळ कोण करणार असा प्रश्न पडला आहे.

ही घटना घडण्याआधी बोट मालकाने योग्य ती काळजी घेणे आवश्यक होते. क्षमतेपेक्षा जास्त प्रवाशी भरणे, प्रवाशांना लाईफ जॅकेट न देणे तसेच नौदलाच्या नवीन स्पीड बोटची चाचणी रहदारी असलेल्या प्रवासी बोटीच्या मार्गात करणे हे चुकीचे असून प्रशासनाने दोषींवर योग्य ती कारवाई करण्याची मागणी प्रज्ञा कांबळे यांच्या कुटुंबियांनी केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Raj-Uddhav Thackeray: राज-उद्धव ठाकरे याआधी एकाच मंचावर कधी आणि कुठे आले होते?

Marathi bhasha Vijay Live Updates : सर्व विसरून ठाकरे बंधू एकत्र ही मोठी गोष्ट, तेजस्विनी पंडीतचं विधान

Sushil Kedia: राज ठाकरेंना धमकी देणं पडलं महागात, उद्योजक सुशील केडियांचं ऑफिस मनसैनिकांनी फोडलं, पाहा VIDEO

Metro In Dino : 'मेट्रो इन दिनों'ची बॉक्स ऑफिसवर संथ सुरुवात, पहिल्या दिवशी कमावले फक्त 'इतके' कोटी

Maharashtra Live News Update: विठ्ठल रुक्मिणी मंदिर फुलांनी सजले

SCROLL FOR NEXT