Political tension escalates in Mumbai as parties clash over alleged Bangladeshi infiltration issue. Saam Tv
मुंबई/पुणे

मुंबईतून बांगलादेशींना हद्दपार करणार महापौरांचा इशारा, बांगलादेशला केंद्र सरकारची मदत' राऊतांचा हल्लाबोल

Bangladeshi Infiltrators Issue In Mumbai BMC: मुंबई महापालिकेत बांगलादेशी घुसखोरांवरून पुन्हा एकदा राजकारण तापलयं... अशातच राऊतांनी मोठा दावा करत बांगलादेशी घुसखोरीवरून भाजपला कसं घेरलयं...

Suprim Maskar

मुंबई महापालिकेच्या महापौरपदाची सूत्र हाती घेताच भाजपच्या रितू तावडेंनी थेट मुंबईतील बांगलादेशी घुसखोरांचा मुद्दा प्रकर्षानं मांडलाय. मुंबईतून बांगलादेशींना बाहेर काढणार, असा इशारा रितू तावडेंनी दिलाय.. त्यामुळे मुंबईच्या राजकारणात 'बांगलादेशी घुसखोर'चा मुद्दा पुन्हा एकदा केंद्रस्थानी आलाय...

दरम्यान भाजपच्या नवनिर्वाचित महापौरानं बांगलादेशी घुसखोरांना हद्दपार करण्याची भाषा केल्यावर हिंदूंची हत्या करणाऱ्या बांगलादेशला केंद्र सरकार मदत करत असल्याचा दावा संजय राऊतांनी केलाय. तर राऊतांच्या दाव्याला भाजपने प्रत्युत्तर दिलंय....

मुंबईसह पुणे, नाशिक, ठाणे, कल्याण-डोंबिवली इथं बांगलादेशी घुसखोर सापडत आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही बांगलादेशी नागरीकांविरुद्ध कडक कारवाईचे निर्देश पोलीस प्रशासनाला दिलेत. मध्यंतरी कामाठीपुरा परिसरातून लाडकी बहिण योजनेचा लाभ घेणाऱ्या 5 बांगलादेशी महिलांना अटक करण्यात आली होती. बनावट आधारकार्ड आणि शासकीय कागदपत्रांच्या आधारे बांगलादेशी घुसखोर थेट सरकारी तिजोरीवरच डल्ला मारत असतील, तर घुसखोरीचा हा मुद्दा किती गंभीर आहे, हे लक्षात येतं.... आता सत्ताधारी महायुती खरच बांगलादेशींना हद्दपार करणार का ? की यावर नुसतं राजकारण होत राहणार ? याकडे जनतेचे लक्ष आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: सांगलीत तरुणाची हत्या, मृतदेह विहिरीत फेकला

Conversions Bill: महाराष्ट्रात लागू होणार धर्मांतरण कायदा; मंत्रिमंडळाच्या बैठकीत धर्मांतर विरोधी विधेयकाला मंजुरी

Viral Video: आकाशात ३ हजार फुटावर घडली दुर्घटना, 2 पॅराग्लायडर एकमेकांवर आदळले; व्हिडिओ पाहून अंगावर येईल काटा, VIDEO

गजनी, पैलवान ते हिस्ट्री सीटर गुन्हेगार; निलेश घायवळच्या दिली होती कानफटात, गुंड सागर मोहोळकरची कुंडली आली समोर

एमआयएमच्या १० नगरसेवकांचं पद जाणार? काय आहे कारण? VIDEO

SCROLL FOR NEXT