Shawarma Food Poisoning Saam Tv
मुंबई/पुणे

Shawarma Food Poisoning: शोरमा खाल तर हॉस्पिटलला जाल? भिंवडीत शोरमामुळे 56 जणांना विषबाधा ,दुकानावर बुलडोझर

Shawarma Food Poisoning: तुम्ही जर शोरमावर ताव मारत असाल तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे. शोरमा खाल्ल्यामुळे तब्बल 56 जणांना विषबाधा झालीये... एव्हंढच नव्हे तर या दुकानावर पालिकेनं बुलडोझर चालवलाय... हा धक्कादायक प्रकार नेमका कुठे घडलाय?... पाहूयात या रिपोर्टमधून

Rohit Kadam

Shawarma Food Poisoning: तुम्ही जर शोरमा खात असाल तर सावधान... कारण, भिवंडीत शोरमा खाल्ल्यामुळे तब्बल 56 जणांना विषबाधा झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. भिवंडीतल्या वंजारपट्टी नाका परिसरात शोरमा खाल्ल्यानं उलटी, जुलाब, मळमळ आणि तापाचा त्रास सुरू झाला. त्यानंतर या सर्वांना उपचारासाठी भिवंडी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलंय..

विशेष म्हणजे, शोरमामुळे झालेल्या विषबाधेच्या रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होताना दिसतेय. मात्र, या सर्व रुग्णांची प्रकृती सध्या ठीक असल्याची माहिती समोर आलीये... दरम्यान, ए.के. शोरमा दुकानावर महापालिकेनं तोडक कारवाई केलीय...

भिवंडीत अन्नविषबाधेचा हा पहिलाच प्रकार नाही. यापूर्वी जून महिन्यातही शोरमा आणि पिझ्झा खाल्ल्याने तब्बल 107 जणांना विषबाधा झाल्याची घटना घडली होती. त्यामुळे शहरामध्ये वारंवार अशा प्रकारच्या घटना घडत असल्यानं नागरिकांच्या आरोग्याशी खेळ सुरू असल्याचं दिसतंय. उघड्यावर अन्नपदार्थ विकणाऱ्या दुकानांवर शोरमा व पिझ्झा सेंटरवर अन्न व औषध प्रशासन आणि भिवंडी महापालिकेनं ठोस कारवाई करणं गरजेचं आहे. नाहीतर नागरिकांच्या जीवाशी अशाच प्रकारे खेळ होत राहणार एवढं मात्र नक्की...

फैयाज शेख, साम टिव्ही, भिवंडी

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

अतिक्रमण हटावनंतर पुण्यात ‘भाऊ फ्लेक्स काढा’ मोहीम; मनपाकडून पुणे विद्रुपीकरणाचा पुरस्कार जाहीर

Pune Gang War: पुण्याचं होतंय 'गँग्ज ऑफ वासेपूर'; गोळ्या झाडून मेला नाही म्हणून कोयत्यानं वार

दारूड्यांसाठी सरकारची अनोखी योजना; दारू पिण्याआधी होणार मेडिकल टेस्ट

Vaibhav Suryavanshi: क्रिकेटचं ऐतिहासिक 'वैभव' परतलं; वैभव सूर्यवंशीच्या 52 चेंडूत 204 धावा

Thursday Horoscope: आज 3 राशींच्या आयुष्यात घडणार आनंददायी बदल, तर काहींना कामाच्या ठिकाणी नव्या आव्हानांचा सामना करावा लागणार

SCROLL FOR NEXT