भाईंदरमध्ये कारमधील एअरबॅग अचानक उघडल्याने २५ तरुणाचा मृत्यू
एअरबॅगच्या तीव्र धक्क्यामुळे तरुणाच्या मानेवर गंभीर दुखापत
उपचारादरम्यान त्याचा मृत्यू
पोलीस तपास सुरु आहे
मनोज तांबे, मुंबई
मुंबईच्या भाईंदरमध्ये धक्कादायक घटना घडली आहे. गाडी चालवत असताना एअरबॅग अचानक उघडल्याने २५ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना प्लेजंट पार्क परिसरात घडली. या घटनेमुळे वाहनांच्या सुरक्षाव्यवस्थेबाबत अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. याप्रकरणी पोलीस पुढील तपास करत आहेत. मोहित सोनी (वय २५) असे मृत तरुणाचे नाव असून तो भाईंदरमधील प्लेजंट पार्क परिसरात राहत होता.
मिळालेल्या माहितीनुसार, मोहित आपल्या कारमधून प्रवास करत असताना अचानक गाडीतील एअरबॅग उघडली. कोणतीही मोठी धडक किंवा अपघात न घडता एअरबॅग उघड असल्याचे सांगितले जात आहे. एअरबॅग उघडताना झालेल्या तीव्र धक्क्यामुळे मोहितच्या मानेवर गंभीर दुखापत झाली.
घटनेनंतर त्याची प्रकृती झपाट्याने खालावू लागली. स्थानिक नागरिक आणि कुटुंबीयांच्या मदतीने त्याला तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी त्याच्यावर उपचार सुरू केले, मात्र दुखापत गंभीर असल्याने उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. या घटनेमुळे कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून परिसरातही हळहळ व्यक्त केली जात आहे.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. तसेच संबंधित वाहनाची तपासणी करण्यासाठी तांत्रिक तज्ज्ञांची मदत घेतली जात असल्याची माहिती समोर आली आहे. एअरबॅग नेमकी कोणत्या कारणामुळे उघडली, त्यामागे तांत्रिक बिघाड होता का, वाहनाच्या सेन्सरमध्ये काही दोष होता का किंवा इतर कोणते कारण होते का, याचा सखोल तपास सुरू आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.