Mumbai BEST Worker Protest Saam TV
मुंबई/पुणे

Mumbai BEST Worker Protest: मुंबईकरांचे हाल! सलग तिसऱ्या दिवशीही बेस्ट कंत्राटी कर्मचाऱ्यांचा संप

साम टिव्ही ब्युरो

संजय गडदे

Mumbai News: मुंबईत मागील तीन दिवसांपासून बेस्टचे कंत्राटी कामगार संपावर गेले आहेत.आज संपाचा तिसरा दिवस असून संप अजूनही कायम आहे. मुंबईतील प्रमुख बस डेपो असलेल्या ओशिवरा दिंडोशी येथे आज बेस्ट कंत्राटी कर्मचारी जमले असून संप कायम सुरू आहे. (Latest Mumbai BEST Worker Protest News)

नागरिकांचे हाल

मुंबईतील प्रमुख बस डेपो असलेल्या ओशिवरा दिंडोशी मजास आणि सांताक्रुज या डेपोतील शेकडो कंत्राटी चालक, वाहक कर्मचारी मागील तीन दिवसांपासून संपावर आहेत. संप असल्याने मुंबईतील प्रमुख बस डेपोमधील बसेस डेपो बाहेर देखील येत नाहीयेत. यामुळे नोकरदार वर्गाला मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.

संपाच्या पहिल्या दोन दिवसात कंत्राटी कामगारांनी आझाद मैदानावर धरणे आंदोलन केले. मात्र आज संपाच्या तिसऱ्या दिवशी कर्मचारी डेपोच्या प्रवेशद्वारावर जमा झालेत. तसेच डेपोतील इतर कामगारांना बस बाहेर काढू देण्यास मनाई करत आहेत. यामुळे रस्त्यावर गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आहे.

बेस्टच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या मागण्या काय?

- महिना १६ हजार रुपये असलेले वेतन २५ हजार रुपयांपर्यंत वाढवावे.

- बेस्ट बसमधून कंत्राटी कर्मचाऱ्यांना मोफत प्रवास सेवा द्यावी.

- नादुरुस्त बसची दुरुस्ती करूनच त्या आगाराबाहेर काढाव्यात.

- बंद बसमार्ग पुन्हा सुरू करावेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sanjay Raut: 'डरपोक शिंदे सरकार, निवडणुका घेण्याची हिम्मत नाही', संजय राऊतांनी तोफ डागली; 'वन नेशन, वन इलेक्शन'वरुनही टीका

Maval News : शरद पवारांच्या पक्षाला भाजपचा पाठिंबा? अजितदादांच्या आमदाराचा गंभीर आरोप

Maharashtra News Live Updates : धनगर आंदोलनाचे पडसाद, पुणे- इंदापूर महामार्ग रोखला

Train Cancelled: पुण्यातून धावणाऱ्या तब्बल १० रेल्वेगाड्या रद्द; अनेकांचे मार्ग बदलले; कारण काय?

Mahalakshmi Yog: ३ दिवसांनी बनणार पॉवरफुल महालक्ष्मी योग; 'या' राशींच्या नशीबाचे दरवाजे उघडणार

SCROLL FOR NEXT