Mumbai News Saam Tv
मुंबई/पुणे

Mumbai Best Bus : मुंबईकरांसाठी 'बेस्ट' बातमी! काळाघोडा ते ओशिवरा प्रवास फक्त ५० रुपयांत

Mumbai News : मुंबईकर आणि पर्यटकांसाठी बेस्टने नवा ए-८४ वातानुकूलित बस मार्ग सुरू केला आहे. काळाघोडा ते ओशिवरा हा प्रवास कोस्टल रोडवरून फक्त ५० रुपयांत होणार असून, आठवड्याचे सातही दिवस सेवा उपलब्ध राहणार आहे.

Alisha Khedekar

  • बेस्टने ए-८४ नवा वातानुकूलित बस मार्ग सुरू केला आहे.

  • काळाघोडा ते ओशिवरा प्रवास फक्त ५० रुपयांत होणार आहे.

  • बस कोस्टल रोडवरून महत्त्वाच्या ठिकाणांवरून धावणार आहे.

  • आठवड्याचे सातही दिवस सेवा उपलब्ध राहणार आहे.

मुंबई शहरातील वाहतूक कोंडी ही काही नवीन नाही. मात्र शहरातील सार्वजनिक वाहतुकीला अधिक चालना देण्यासाठी, प्रवाशांचा प्रवास वेळेत, परवडणारा आणि आरामदायी होण्यासाठी बेस्ट उपक्रमाने नवीन वातानुकूलित बस मार्ग 'ए-८४' सुरू करण्याची घोषणा केली आहे. ही नवीन बससेवा रविवार, ७ सप्टेंबरपासून सुरू होत आहे.

नव्याने सुरु होणारी ही बससेवा डॉ. श्यामा प्रसाद मुखर्जी चौक ते ओशिवरा बस आगारा दरम्यान कोस्टल रोड वरून धावणार आहे. खासगी अॅप आधारित टॅक्सीमधून डॉ. श्यामा प्रसाद मुखर्जी चौकातून ओशिवरा बस आगारापर्यंत जाण्यासाठी सुमारे ५०० ते ७०० रुपये मोजावे लागतात. तर गर्दीच्या वेळी ७०० हून अधिक रुपये द्यावे लागतात. मात्र, बेस्टच्या या नव्या 'ए-८४' बसमधून प्रवाशांचा हा प्रवास केवळ ५० रुपयांत होणार आहे.

ही बस डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी चौक (संग्राहालय), अहिल्याबाई होळकर चौक (चर्चगेट स्थानक), स्वराज्य रक्षक धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज सागरी किनारा मार्ग (कोस्टल रोड), वरळी सी फेस, वरळी आगार, बाबासाहेब वरळीकर चौक, महापौर बंगला (शिवाजी पार्क), माहीम, खार स्थानक रोड (पश्चिम), सांताक्रूझ आगार, विर्लेपार्ले, अंधेरी स्थानक (पश्चिम), ओशिवरा पूल, ओशिवरा आगार यांसारख्या महत्त्वाच्या ठिकाणांहून प्रवास करेल.असे बेस्ट उपक्रमाने म्हटले आहे.

बेस्ट उपक्रमाच्या ताफ्यात नवीन वातानुकूलित बस टप्प्याटप्याने समावेश करण्यात येत आहे. त्यापैकी काही बस उपक्रमाच्या ताफ्यात दाखल झाल्या आहेत. सुमारे ५०० ते ७०० रुपये मोजावे लागत आहेत. तर गर्दीच्या ठिकाणी ७०० हून अधिक रुपये द्यावे लागतात. मात्र, बेस्टच्या 'ए-८४' बसमधून प्रवाशांना हाच प्रवास केवळ ५० रुपयांत करता येईल.

ही बस डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी चौक (संग्राहालय), अहिल्याबाई होळकर चौक (चर्चगेट स्थानक), स्वराज्य रक्षक धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज सागरी किनारा मार्ग (कोस्टल रोड), वरळी सी फेस, वरळी आगार, बाबासाहेब वरळीकर चौक, महापौर बंगला (शिवाजी पार्क), माहीम, खार स्थानक रोड (पश्चिम), सांताक्रूझ आगार, विर्लेपार्ले, अंधेरी स्थानक (पश्चिम), ओशिवरा पूल, ओशिवरा आगार यांसारख्या महत्त्वाच्या ठिकाणांहून प्रवास करेल.असे बेस्ट उपक्रमाने म्हटले आहे.

बेस्ट उपक्रमाच्या ताफ्यात नवीन वातानुकूलित बस टप्प्याटप्याने समावेश करण्यात येत आहे. तत्पूर्वी काही बसगाड्या उपक्रमाच्या ताफ्यात दाखल सुद्धा झाल्या आहेत. नव्याने विकसित केलेल्या सागरी किनारी मार्गावरून बससेवा चालविण्यात आल्याने, प्रवाशांना आणि पर्यटकांना एक वेगळा अनुभव घेता येईल, असे बेस्ट उपक्रमातील अधिकाऱ्याने सांगितले.

या बस प्रवासाचे भाडे कमीत कमी १५ रुपये आणि जास्तीत जास्त ५० रुपये आहे. ज्यामुळे प्रवाशांना ही सेवा परवडणारी आणि सुखकर असेल. ही सेवा आठवड्याच्या सातही दिवस कार्यरत असणार आहे. त्यामुळे ही बस सेवा प्रवाशांना सतत उपलब्ध असेल आणि बससाठी वाट पाहावी लागणार नाही. प्रवाशांनी या बस सेवेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन बेस्ट उपक्रमातर्फे करण्यात आले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Elections:भाजपला रोखण्यासाठी काका-पुतण्या एकत्र? ठाकरेंपाठोपाठ दोन्ही राष्ट्रवादीचीही युती?

KDMC Election: भाजपा–शिवसेना शिंदे गटकाडून युतीचे संकेत; मात्र जागा वाटपाचा तिढा अजूनही गुलदस्त्यात

Kalyan Politics: फोडाफोडीवरून महायुतीत पुन्हा वाद; शिवसेनेनं नगरसेवक पळवल्यानंतर भाजप आक्रमक

Maharashtra Elections: बायको, मुलगा-मुलगी,भाऊ-बहिणींनाच हवीय उमेदवारी; नेत्यांना फक्त आपल्याच घरात हवं तिकीट

कराडची जामीनासाठी न्यायालयात धाव, सुटकेनंतर समर्थक काढणार हत्तीवरून मिरवणूक?

SCROLL FOR NEXT