Mumbai Best Bus Accident ANI
मुंबई/पुणे

बेस्ट बसचे अचानक ब्रेक फेल; रिक्षाला फरफटत नेलं, टेम्पोलाही ठोकलं, पाहा VIDEO

या घटनेचा सीसीटीव्ही व्हिडिओ देखील व्हायरल झाला आहे.

साम टिव्ही ब्युरो

मुंबई : एकीकडे मुंबईत मुसळधार पाऊस सुरू असताना, दुसरीकडे अपघाताच्या घटना घडत आहेत. अशातच मुंबईतील (Mumbai) बेस्ट बसला अपघात झाल्याचं वृत्त समोर आलं आहे. या अपघातामध्ये बेस्ट बसने (Bus Accident) रिक्षाला अक्षरशः फरफटत नेलं. याव्यतिरिक्त टेम्पोलाही धडक दिली आहे. या घटनेचा सीसीटीव्ही व्हिडिओ देखील व्हायरल झाला आहे. (Mumbai Best Bus Accident Latest News)

मिळालेल्या माहितीनुसार, बसचे ब्रेक फेल झाल्याने हा अपघात झाला आहे. सुदैवाने या अपघातात कुठलीही जीवितहानी झाली नाही. मात्र काळजाचा ठोका चुकवणाऱ्या या अपघातामध्ये, ज्या रिक्षाला बेस्ट बसने चिरडलं, त्या रिक्षाचा चालक थोडक्यात बचावला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, कुंडलिक किसन धोंगडे हे 326 क्रमांकाची बस चालवित होते. ही बस डाऊन दिशेने शिवशाही प्रकल्प, दिंडोशी वरून कुर्ल्याकडे जात होती. त्यावेळी साधारण 03.45 वाजता संतोष नगर बीएमसी कॉलनी, डी वार्ड समोरील मंदिराला बसने धडक दिली. बसने केवळ धडकच दिली नाही तर बस समोरील रिक्षाचा चेंदामेंदा झाला.

अपघातातील जखमींची नावे

वाहक - आबासो कोरे वय ५४

चालक - कुंडलिक किसन धोंगडे वय ४३

होवाळ सरकू पांडे वय ४५ (रिक्षा चालक)

प्रवासी - गोविंद प्रसाद पाठक वय ८० रजनिष कुमार पाठक वय ३७ जखमी झालेल्या व्यक्तींवर वेदांत खाजगी रुग्णालय, दिंडोशी येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

Edited By - Satish Daud

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Daily Horoscope: 'या' राशींवर देवी लक्ष्मी होणार प्रसन्न, पैशाची चणचण भासणारच नाही; वाचा तुमचे राशीभविष्य

Manoj Jarange Patil: विधानसभेसाठी मनोज जरांगेंचा फुलप्रुफ प्लॅन, मविआला बसणार फटका? वाचा स्पेशल रिपोर्ट

Sharad Pawar: निवडणूक आयोगाचा शरद पवार गटाला मोठा दिलासा; Trumpet च्या चिन्हाचं भाषांत्तर 'ट्रम्पेट' च

Prakash Ambedkar: निवडणुकीच्या रणधुमाळीत प्रकाश आंबेडकरांची प्रकृती खालवली; रक्तात आढळली गाठ

Adulterated Sweets: ऐन सणासुदीत भेसळीचा काळाबाजार; बाजारात विकला जातोय नकली खवा?

SCROLL FOR NEXT