Bandra Atlantic Building Fire  Saam TV
मुंबई/पुणे

Mumbai Fire : मुंबईत मध्यरात्री थरार! 'अटलांटिक' इमारतीचा सातवा मजला जळून खाक; एकाचा होरपळून मृत्यू, २ जवान गंभीर

Bandra Atlantic Building Fire : मुंबईतील बांद्रा पश्चिम येथील अटलांटिक इमारतीच्या सातव्या मजल्यावर भीषण आग लागून एका ६४ वर्षीय रहिवाशाचा मृत्यू झाला. आग विझवताना दोन अग्निशमन जवान जखमी झाले.

Namdeo Kumbhar

संजय गडदे, मुंबई प्रतिनिधी

Mumbai Bandra Fire Death : बांद्रा (पश्चिम) येथील शेर्ली राजन रोडवरील 'अटलांटिक' इमारतीच्या सातव्या मजल्यावर बुधवारी रात्री भीषण आग लागली. या दुर्घटनेत एका ६४ वर्षीय रहिवाशाचा मृत्यू झाला असून, आग विझवताना दोन अग्निशमन जवान जखमी झाले आहेत. सुमारे अडीच तासांच्या अथक प्रयत्नांनंतर अग्निशमन दलाला आग आटोक्यात आणण्यात यश आले.

मुंबई अग्निशमन दलाने दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी रात्री ९.१२ च्या सुमारास आगीची माहिती मिळाली. आगीचे गांभीर्य लक्षात घेऊन रात्री ९.५५ वाजता ही लेव्हल-१ ची आग असल्याचे घोषित करण्यात आले. अग्निशमन दल, मुंबई पोलीस, १०८ रुग्णवाहिका सेवा, अदानी इलेक्ट्रिसिटीचे कर्मचारी आणि पालिका अधिकाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत संयुक्तरीत्या बचावकार्य सुरू केले. रात्री ११.५० वाजता ही आग पूर्णपणे आटोक्यात आली. आगीचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नसून, संबंधित यंत्रणांकडून या प्रकरणाचा तपास सुरू आहे.

दोन सदनिका जळून खाक

ही आग तळमजला अधिक सात मजल्यांच्या इमारतीमधील सातव्या मजल्यावरील रूम नंबर ७०१ आणि ७०२ मध्ये लागली होती. आगीत घरातील इलेक्ट्रिक वायरिंग, इलेक्ट्रिकल इन्स्टॉलेशन आणि इतर घरगुती साहित्य जळून खाक झाले. आगीची माहिती मिळताच काही रहिवासी वरच्या मजल्यांवर अडकल्याची भीती व्यक्त केली जात होती, त्यामुळे अग्निशमन दलाने तात्काळ शोध आणि बचाव मोहीम राबवली.

वृद्धाचा दुर्दैवी मृत्यू

बचावकार्यादरम्यान अझीम बारोडावाला (६४) यांना इमारतीमधून बाहेर काढून तातडीने भाभा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता, असे डॉक्टरांनी घोषित केले. या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

दोन अग्निशमन जवान जखमी

आग विझवण्याच्या मोहिमेदरम्यान बांद्रा अग्निशमन केंद्राचे शिवशंकर भारत पुरी (३२) आणि नवनाथ मोहन बिटे (३४) हे दोन जवान धुरामुळे गुदमरल्याने जखमी झाले. त्यांना तातडीने भाभा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे समजते.

स्थानिक रहिवाशांनी दिलेल्या माहितीनुसार, आगीच्या ज्वाळा काही वेळातच सातव्या मजल्यावर वेगाने पसरल्यामुळे परिसरात घबराटीचे वातावरण निर्माण झाले होते. आजूबाजूच्या उंच इमारतींमधूनही आगीचे लोळ स्पष्ट दिसत होते. अग्निशमन दलाच्या अनेक गाड्यांनी घटनास्थळी धाव घेत आग इतर मजल्यांवर पसरण्यापासून रोखली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: सायन–पनवेल महामार्ग जलमय; कळंबोलीत महामार्गावर वाहतुकीचा वेग मंदावला

Ayodhya Ram Temple : अयोध्येतील राम मंदिर व्यवस्थेत मोठे बदल; देणगी घोटाळ्यानंतर सर्वच नियम बदलले

फक्त नथच नाही! नोज पिनच्या या ५ सुंदर डिझाईन्स साडीवर उठून दिसतील

Rent Agreement: रेंट एग्रीमेंट संपण्यापूर्वीच भाडेकरूने घर सोडल्यास डिपॉझिटचे काय होते? घरमालक पैसे जप्त करू शकतो का?

Accident: महामार्गावर अपघाताचा थरार! पंक्चर काढताना पिकअपला अज्ञात वाहनाची धडक; चाकाखाली चिरडून ४ तरुणांचा मृत्यू

SCROLL FOR NEXT