Mumbai Police Viral News Saam Tv
मुंबई/पुणे

Mumbai News: मुंबईत पॅराग्लाईडर्स, पॅरा मोटर्स, मायक्रोलाईट एअर क्राफ्ट, ड्रोनच्या वापरावर १६ सप्टेंबरपर्यंत बंदी

Mumbai Latest News: मुंबईत पॅराग्लाईडर्स, पॅरा मोटर्स, मायक्रोलाईट एअर क्राफ्ट, ड्रोनच्या वापरावर १६ सप्टेंबरपर्यंत बंदी

Satish Kengar

Mumbai Latest News:

राष्ट्रीय हिताला बाधा पोहचविणाऱ्या तसेच राष्ट्रद्रोही कारवायांसाठी कारणीभूत ठरतील असे घटक जसे पॅराग्लाईडर्स, रिमोट कंट्रोल्ड मायक्रोलाईट एअरक्राफ्ट, ड्रोन, पॅरा मोटर्स, हँण्ड ग्लायडर्स, हॉट एअर बलूनच्या उड्डाणक्रियांना मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत 16 सप्टेंबर 2023 पर्यंत बंदी असल्याची माहिती पोलीस उपायुक्त, विशाल ठाकूर यांनी आज परिपत्रकाद्वारे दिली आहे.

मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रात कुठेही कायदा व सुव्यवस्था बिघडणार नाही, सामान्य जनतेला धोका उत्पन्न होणार नाही, अति महत्त्वाच्या व्यक्तींना धोका निर्माण होणार नाही. सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान होऊ नये याकरीता हे बंदीचे आदेश लागू आहेत. (Latest Marathi News)

तसेच ज्यांनी या कालावधीत पूर्व लेखी परवानगी घेतली आहे, अशांसाठी हा आदेश शिथिल असेल. तसेच या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायद्यान्वये कारवाई करण्यात येईल, असेही परिपत्रकात म्हटले आहे.

विमानतळाच्या आजुबाजूला मुक्त उड्डाणक्षेत्रात फुगे, पतंग, उंच उडणारे फटाके उडवण्यास २१ ऑक्टोबरपर्यंत बंदी

यातच छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ, जुहू एरोड्रोम, नौदल हवाई स्टेशन आयएनएस शिक्राच्या आसपासच्या मुक्त उड्डाणक्षेत्रात विमानाच्या दिशेने व धावपट्ट्यांच्या दृष्टिकोन मार्गात फुगे, उंच उडणारे फटाके, प्रकाश उत्सर्जीत करणारी वस्तू, पतंग आदींना मुंबईत क्षेत्रात 21 ऑक्टोबरपर्यंत बंदी असल्याची माहितीही पोलीस आयुक्त विशाल ठाकूर यांनी दिली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CM Fadnavis: देवेंद्र फडणवीसांना दिलासा; याचिकेतून विधानसभा निवडणुकीतील विजयाला दिलं होतं आव्हान

Maharashtra Live News Update: धाराशिवात १७ मुलींना झाली विषबाधा

The Hunt: माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या हत्येवर आधारित 'द हंट' ही मालिका तुम्ही कधी आणि कुठे पाहू शकता?

Apoorva Nemalekar : “प्रवास सोप्पा नव्हता...'' मालिकेला निरोप देताना अपूर्वाची भावूक पोस्ट व्हायरल

Rupali Bhosle: 'रूप तेरा मस्ताना' रूपाली भोसलेचे फोटो पाहून तुम्हीही हेच म्हणाल...

SCROLL FOR NEXT