Mumbai Local Train mega block  Saam Tv
मुंबई/पुणे

Mumbai Local : धक्कादायक! बदलापूर लोकलवर दगडफेक, महिला प्रवाशाच्या डोळ्यावर वार, रक्ताने तोंड माखलं

woman injured in Mumbai local train stone pelting incident : मुंबईतील दादर स्थानकावर धावत्या लोकलवर दगडफेक झाल्याने महिला प्रवासी गंभीर जखमी झाली. या घटनेमुळे लोकल प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

Namdeo Kumbhar

मयूर राणे, मुंबई प्रतिनिधी

मुंबईची लाईफलाईन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लोकल ट्रेनमधील प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. आज दादर रेल्वे स्थानकावर एका धावत्या लोकलवर अज्ञाताने दगड भिरकावल्याची खळबळजनक घटना घडली. या दगडफेकीत महिला डब्यातील एक महिला प्रवासी गंभीर जखमी झाली आहे. त्या महिलेच्या डोळ्याजवळून मोठ्या प्रमाणात रक्त येत होते. त्या महिलेवर खासगी रूग्णालयात उपचार करण्यात येत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) येथून सकाळी ७:१४ वाजता बदलापूरच्या दिशेने जाणारी लोकल दादर स्थानकात आल्यानंतर ही घटना घडली. रेल्वे स्थानकाबाहेरील रेल्वे रुळांच्या बाजूला उभं असणाऱ्या एका अज्ञाताने गाडीच्या महिला डब्याला लक्ष्य करत दगड भिरकावला. हा दगड थेट डब्यात बसलेल्या एका महिला प्रवाशाला लागला.

दगड लागल्याचा वेग इतका जास्त होता की, त्या महिलेच्या उजव्या डोळ्याच्या खाली आणि कपाळाच्या बाजूला गंभीर जखम झाली. दगड लागताच डब्यात एकच गोंधळ उडाला आणि इतर महिला प्रवाशांनी आरडाओरडा सुरू केला. जखमी महिलेच्या चेहऱ्यावरून मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव सुरू झाला होता. ही घटना लक्षात येताच डब्यातील इतर प्रवाशांनी तातडीने मदतीसाठी धाव घेतली.

गाडी दादर स्थानकात उभी राहताच रेल्वे पोलीस आणि स्थानकावरील कर्मचाऱ्यांनी जखमी महिलेला डब्यातून खाली उतरवले. घटनेचे गांभीर्य ओळखून त्यांना तातडीने रेल्वेच्या प्रथमोपचार केंद्रात नेण्यात आले. प्राथमिक उपचार केल्यानंतर पुढील उपचारांसाठी त्यांना जवळच्या रुग्णालयात हलवण्यात आले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

आधारकार्डधारकांना मोफत इलेक्ट्रिक सायकल? इलेक्ट्रिक सायकलसंदर्भात मोदींची घोषणा?

देशात कागदी चलनाचे दिवस संपणार? RBI प्लास्टिकच्या नोटा चलनात आणणार?

Thane Water Cut: ठाणेकरांसाठी महत्वाची बातमी, ३ जून रोजी पाणीपुरवठा राहणार बंद, कोणकोणत्या भागांना बसणार फटका?

Deepali Sayyad: 'कितीही धमक्या येऊ द्या....'; भोंदू अशोक खरातवरील चित्रपटाबाबत अभिनेत्री दीपाली सय्यदची ठाम भूमिका

Maharashtra News Live Update: नीट पेपरफुटी प्रकरणी सर्वात मोठी अपडेट, मनीषा हवलदार आणि तेजस शहा यांच्या मधला दुवा सापडला?

SCROLL FOR NEXT