Mumbai- Ayodhya Amrit Bharat Express saam tv
मुंबई/पुणे

'अमृत भारत' एक्सप्रेसचा नवा मार्ग, दिवाळीसाठी मुंबईतून सुटणार २४ विशेष रेल्वे, जाणून घ्या बुकिंग अन् थांब्यांची माहिती

Mumbai-Ayodhya Amrit Bharat Special Train: दसरा, दिवाळी आणि छठ पूजेनिमित्त मध्य रेल्वेने मुंबईतील लोकमान्य टिळक टर्मिनस ते अयोध्या कॅंटदरम्यान २४ सणासुदीच्या विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे.

Namdeo Kumbhar

दसरा, दिवाळी आणि छठ पूजेच्या सण-उत्सवांच्या काळात रेल्वे गाड्यांमधील होणारी गर्दी लक्षात घेता मध्य रेल्वेने प्रवाशांसाठी एक मोठी खूशखबर दिली आहे. मुंबईतील लोकमान्य टिळक टर्मिनस (LTT) ते अयोध्या कॅंट दरम्यान २४ साप्ताहिक सण-उत्सव विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. विशेष म्हणजे या सर्व गाड्या अत्याधुनिक आणि आरामदायी 'अमृत भारत' रेकद्वारे चालवल्या जाणार आहेत.

गाड्यांचे वेळापत्रक आणि दिवस:

एलटीटी ते अयोध्या कॅंट (गाडी क्र. 01045): ही गाडी १९ ऑक्टोबर २०२६ ते २७ नोव्हेंबर २०२६ दरम्यान दर सोमवारी आणि शुक्रवारी लोकमान्य टिळक टर्मिनस येथून सकाळी ०७:३५ वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी १०:१५ वाजता अयोध्या कॅंट येथे पोहोचेल (एकूण १२ फेऱ्या).

अयोध्या कॅंट ते एलटीटी (गाडी क्र. 01046):

परतीच्या प्रवासासाठी ही गाडी २० ऑक्टोबर २०२६ ते २८ नोव्हेंबर २०२६ दरम्यान दर मंगळवारी आणि शनिवारी अयोध्या कॅंट येथून दुपारी १३:५० (१:५०) वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी सायंकाळी १७:१५ (५:१५) वाजता लोकमान्य टिळक टर्मिनस येथे पोहोचेल (एकूण १२ फेऱ्या).

प्रमुख थांबे:

या गाडीला कल्याण, इगतपुरी, नाशिक रोड, मनमाड, भुसावळ, खंडवा, इटारसी, जबलपूर, कटनी, सतना, माणिकपूर, प्रयागराज जंक्शन, प्रतापगड आणि सुलतानपूर या महत्त्वाच्या स्थानकांवर थांबा देण्यात आला आहे.

बोगींची रचना:

अमृत भारत रेक असलेल्या या ट्रेनमध्ये ८ शयनयान (Sleeper), ११ सामान्य द्वितीय श्रेणी (General Unreserved), १ पॅन्ट्री कार आणि २ गार्ड्स ब्रेक व्हॅन असे डबे असणार आहेत.

आरक्षण आणि तिकीट बुकिंग:

गाडी क्रमांक 01045 चे बुकिंग सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर आणि IRCTC च्या अधिकृत वेबसाईटवर (www.irctc.co.in) उपलब्ध आहे. तसेच, अनारक्षित डब्यांसाठी प्रवासी UTS ॲप किंवा 'रेलवन' (RailOne) ॲपद्वारे तिकिटे बुक करू शकतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune News: पुण्यात फायनान्स कंपनीविरोधात शिंदेसेना आक्रमक, शेतकऱ्याच्या घराचं सील तोडलं

Train Accident: २ प्रवासी ट्रेनची एकमेकांना धडक, आतापर्यंत ४ प्रवाशांचा मृत्यू; ८८ जण गंभीर जखमी

Monday Horoscope: या राशींच्या आयुष्यात होणार मोठे बदल! कोणाला मिळणार पैशांचा लाभ? वाचा राशिभविष्य

Weight Loss Tips : वजन कमी करण्याचं सिक्रेट; 5 पदार्थ दररोजच्या आहारातून करा हद्दपार

Khan Saree Designs: महिलांसाठी खणाच्या साड्यांच्या लेटेस्ट डिझाईन्स, हे 5 पॅटर्न्स दिवाळीत दिसतील उठून

SCROLL FOR NEXT