Andheri Crime News
Andheri Crime News Saam Tv
मुंबई/पुणे

Mumbai Crime News: मुंबईत 20 किलो गांजा जप्त, पाच जणांना बेड्या; अंधेरी पोलिसांची कारवाई

साम टिव्ही ब्युरो

>> संजय गडदे

Andheri Crime News: अंधेरी परिसरात गांजाची विक्री करण्यासाठी आलेल्या पाच संशयितांना पोलिसांनी अटक केली आहे. अंधेरी पूर्वेकडील तेली गल्ली परिसरातील केशरबाई चाळ परिसरात ही कारवाई करण्यात आली.

या कारवाईत अटक करण्यात आलेल्या आरोपींकडून अंधेरी पोलिसांनी 20 किलो 400 ग्रॅम गांजा जप्त केला आहे. जप्त करण्यात आलेल्या गांजाची किंमत सुमारे पाच लाख दहा हजार रुपये इतकी आहे.

विजय रमेश इन्द्रेकर, (53 वर्षे) बरखा विजय इन्द्रेकर, (55 वर्ष), गौरी सुरज नेवलेकर (78 वर्ष), रागिनी सागर इंद्रेकर (24 वर्ष) आणि सारिका बबलू इंद्रेकर (35 वर्ष) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपीची नावे आहेत. हे सर्व संशयित आरोपी अंधेरी पूर्वेकडील तेलीगल्ली परिसरातील रहिवासी आहेत.  (Latest Marathi News)

अंधेरी पोलिसांनी 25 ऑगस्ट च्या मध्यरात्री NDPS कायद्या अंतर्गत कारवाई करत पाच जणांवर गुन्हा दाखल करून एक पुरुष आरोपीस अटक केली आहे व इतर चार महिला आरोपींना 46(4) अन्वये नोटीस देण्यात आली आहे.कलम ८ (क) मह २० (क), २९ एन. डी. पी. एस कायदा १९८५ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला असुन एक पुरुष व चार महिला यांना अटक करण्यात आली आहे.

अंधेरी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संताजी घोरपडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक बालाजी दहिफळे, सपोनि सचिन करंजकर, पोउनि अमित यादव, पोउनि रविंद्र लाखण, पोह. ९८०५४३ / गांगुर्डे, पो.ह. ०१४६० / वायंगणकर, पोह ०३०८२३ / भोईटे, पो.ह. ०४.०७२३ / गांवकर, मपोशि ०७१३९६ / आंबेकर यांनी उल्लेखनिय कामगिरी पार पाडत बेकायदेशीर रित्या गांजा हा अमली पदार्थ बाळगणाऱ्या पाच आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tourism Tips: One Day Trip करण्यासाठी हे ठिकाणं आहेत बेस्ट

Vastu Tips: झाडू वापरताना चुका नका करू, नाहीतर येईल दारिद्र्य

Zika Virus Symptoms VIDEO: झिकाकडे दुर्लक्ष कराल,जीवाला मुकाल? महिलांना सर्वात जास्त धोका? जाणून घ्या लक्षणे

VIDEO: ठाकरे शिंदेंना धक्का देणार? नार्वेकरांना निवडून आणण्यासाठी काय आहे मास्टर प्लॅन? जाणून घ्या

Sharad Pawar-Rahul Gandhi: पवारांचा राहुल गांधींना वारीचं निमंत्रण...

SCROLL FOR NEXT