चढावरून रिव्हर्स आला ट्रक; रिक्षाचा चेंदामेंदा होऊन झाला भीषण स्फोट!
चढावरून रिव्हर्स आला ट्रक; रिक्षाचा चेंदामेंदा होऊन झाला भीषण स्फोट! SaamTVNews
मुंबई/पुणे

चढावरून रिव्हर्स आला ट्रक; रिक्षाचा चेंदामेंदा होऊन झाला भीषण स्फोट!

अजय दुधाणे

अंबरनाथ : अंबरनाथ पूर्व परिसरात आज एक विचित्र अपघात घडला आहे. अंबरनाथमधील अप्रतिम हॉटेल जवळील अरूंद नाल्याच्या पुलावरून जाणारा ट्रक क्रमांक - MH 04 CU 7681 हा गंधकाने (सल्फर) भरलेला ट्रक अंबरनाथ (Ambernath) कडून शिळ रोडकडे जात असताना नाल्यावरील पुलावर चढ चढताना हा ट्रक रस्त्यावर अचानक बंद पडून तो अचानकपणे पाठीमागे रिव्हर्स आल्याने त्याच्या पाठीमागे असणारी रिक्षा (Rickshaw) सदर ट्रकखाली आल्याने मोठा अपघात झाला.

या अपघातात (Accident) ट्रकखाली येऊन रिक्षात असणाऱ्या टाकीचा स्फोट होऊन ट्रकला (Truck) भीषण आग लागली व आगीमध्ये ट्रकमधील सल्फरने पेट घेतल्याने मोठा स्फोट (Blast) घडून आला. या घटनेत आतापर्यंत दोन जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. पुलावरच हा अपघात घडून आल्याने बराच काळ वाहतूक ठप्प झाली होती.

सदर घटनेचे गांभीर्य ओळखून घटनास्थळावर अंबरनाथ वाहतुक विभागाने ताबडतोब पोहचून, अपघातामुळे घटनास्थळी निर्माण झालेली वाहतूक कोंडी तात्काळ सोडविण्याचा प्रयत्न केला. या अपघातानंतर नाल्यामध्ये अडकलेला ट्रक आणि ट्रकच्या खाली अडकलेली रिक्षा काढण्याचे काम सुरू असून फायर ब्रिगेडच्या गाड्यासुद्धा घटनास्थळी दाखल झाल्या आहेत.

Edited By : Krushnarav Sathe

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Supreme Court: ...तर मानधन सोडा, घशाला आराम द्या; रोहतगींच्या त्या विनंतीवर CJI चंद्रचूड यांचं उत्तर

Pune Crime: कात्रज,स्वारगेट परिसरात दोन जणांचा खून; शिवीगाळ केल्याच्या वादातून एकाने डोक्यात घातला दगड

Maharashtra Drought: राज्यात पाणीटंचाईच्या झळा तीव्र; नद्या आटल्या, विहिरी कोरड्याठाक, हंडाभर पाण्यासाठी वणवण

Lok Sabha Election: तिसरा टप्पा BJP साठी महत्त्वाचा, 2019 मध्ये याच टप्प्यात मिळालं होतं मोठं यश; यंदा काय आहे राजकीय परिस्थिती?

MI vs SRH,IPL 2024: हैदराबादवर सूर्या कोपला! शतकी खेळीनं मुंबईच्या लल्लाटी विजयी 'तिलक', प्ले ऑफची समीकरणंच विस्कटली

SCROLL FOR NEXT