Mumbai International Airport Saam Tv
मुंबई/पुणे

Mumbai Airport: मुंबई विमानतळाने पुन्हा रचला इतिहास, एका दिवसात दिली तब्बल 'इतक्या' लाख प्रवाशांना सेवा

Mumbai International Airport: मुंबई विमानतळाने पुन्हा रचला इतिहास, एका दिवसात दिली तब्बल 'इतक्या' लाख प्रवाशांना सेवा

Satish Kengar

Mumbai International Airport:

मुंबई विमानतळाने ऐतिहासिक कामगिरीसह आणखी एक नवा टप्पा गाठला आहे. छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर (CSMIA) एका दिवसात विक्रमी 1,61,760 प्रवाशांना सेवा देण्यात आली आहे.

CSMIA सध्या फक्त सिंगल रनवे विमानतळ म्हणून कार्यरत आहे. अदानी समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी यांनीही मुंबई विमानतळाच्या या रेकॉर्डबाबत सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

अदानी समुहाचे अध्यक्ष गौतम अदानी यांनी एक ट्विट करत म्हटलं आहे की, "एक ऐतिहासिक कामगिरी! 11 नोव्हेंबर रोजी, आम्ही 24 तासांत 1,032 उड्डाणे करून विश्वविक्रम नोंदवून सर्वात व्यस्त हवाई वाहतूक दिवस साजरा केला. तसेच आज मुंबई विमानतळावर एक नवीन मैलाचा दगड रचण्याचा मान आम्हाला मिळाला आहे. साध्य...या सिंगल रनवे विमानतळाने एका दिवसात 1,61,760 प्रवाशांना विक्रमी सेवा दिली आहे.''  (Latest Marathi News)

दिवाळीच्या मुहूर्तावर मुंबई विमानतळावरून एक हजाराहून अधिक उड्डाणांची एअर ट्रॅफिक मुव्हमेंट (ATM) नोंद झाली. 11 नोव्हेंबर रोजी 1032 फ्लाइटचे टेकऑफ आणि लँडिंग झाले. सीएसएमआयएसाठी ही मोठी उपलब्धी आहे. आता एका दिवसात 1,61,760 प्रवाशांना सेवा देण्याचा विक्रम झाला आहे.

दरम्यान, मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे (Mumbai International Airport) व्यवस्थापन अदानी समूहाकडे आहे. यापूर्वी, एका दिवसात 1032 हवाई वाहतुकीचा विक्रम नोंदवल्यानंतर, मुंबई विमानतळाने 11 नोव्हेंबर रोजी 1,61,419 प्रवाशांना सेवा दिली होती, आज हा विक्रम मोडला गेला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Narali Purnima 2025: यंदा नारळी पौर्णिमा कधी आहे?

Electric Shock : मोटार सुरु करताना विजेच्या धक्क्याने महिलेचा मृत्यू; माहेरच्यांचा मात्र घातपाताचा आरोप

Maharashtra Live News Update : रत्नागिरी - मुंबई गोवा महामार्गावरील वाहतूक 15 तासानंतर सुरू

Oli Bhel Recipe: चौपाटीवर मिळणारी चटपटीत ओली भेळ, वाचा सीक्रेट रेसिपी

Mangal ketu Yuti: मंगळ-केतूची अशुभ युती अखेर संपली; 'या' राशींचे सुरु होणार अच्छे दिन!

SCROLL FOR NEXT