Bhandup Road Accident Saam Tv News
मुंबई/पुणे

Mumbai Accident: ड्रायव्हर नसताना टेम्पो अचानक धावू लागला, विचित्र अपघातात तरुणाचा जीव गेला; नेमकं काय घडलं?

Bhandup Road Accident: आईस्क्रिम खाण्यासाठी गेलेल्या तरुणाचा अपघातामध्ये मृत्यू झाला. भांडुपच्या एलबीएस रोडवर हा अपघात झाला. याप्रकरणी टेम्पो चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Priya More

मुंबईतल्या भांडुपमध्ये विचित्र अपघाताची घटना घडली आहे. भांडुपच्या एलबीएस मार्गावर हा अपघात झाला. चालक नसलेल्या टेम्पोने दुचाकीला धडक दिली. या अपघातामध्ये स्कूटीचालक तरुणाचा जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे भांडुपमध्ये खळबळ उडाली आहे. भांडुप पोलिस या अपघाताचा तपास करत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, भांडुपच्या एलबीएस मार्गावर एक विचित्र अपघातात झाला. स्कुटीवरून प्रवास करणाऱ्या साजिद आजमी या तरुणाचा या अपघातामध्ये मृत्यू झाला आहे. साजिद आजमी हा त्याच्या दोन मित्रांसह मध्यरात्रीच्या सुमारास स्कुटीवरून आईस्क्रीम खाण्यासाठी मंगतराम पेट्रोल पंप परिसरात गेला होता. आईस्क्रीम खाल्ल्यानंतर हे सर्वजण घरी परतत असताना अपघात झाला.

रत्याच्या कडेला उभा असलेला टेम्पो अचानक एक टेम्पो त्यांच्या दिशेने येताना त्यांनी पाहिलं. या टेम्पोमध्ये चालकच नव्हता तेव्हा साजिदच्या दोन्ही मित्रांनी स्कुटीवरून उडी मारली. पण साजिदचा पाय स्कुटीमध्ये अडकल्यामुळे या टेम्पोने त्याला चिरडलं. त्याच्या मित्रांनी त्याला तात्काळ रुग्णालयात दाखल केलं. परंतू त्याला डॉक्टरांनी उपचारादरम्यान मृत घोषित केलं. भांडुप पोलिसांनी या संदर्भात टेम्पो चालकाविरोधात गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

गर्भलिंगनिदान प्रकरणात चाकणकरांचं नाव अन् भोंदू अशोक खरातचं बीड कनेक्शन उघड; खरात फाईल्समध्ये आला नवा ट्विस्ट

Maharashtra Live News Update: यवतमाळमधील पाणीटंचाईवरून मंत्र्यासमोरच महिलांनी प्रशासनाला धरले धारेवर

Pune : पत्नीची हत्या करून केला इमारतीवरून पडल्याचा बनाव; क्राइम थ्रिलर वेब सिरीजपेक्षा खतरनाक घटनेनं पुणे हादरलं

Sunetra Pawar: मोठी बातमी! सुनेत्रा पवारांविरोधात काँग्रेसने दिला उमेदवार, बडा नेता निवडणुकीच्या रिंगणात

Maharashtra Ratna Award 2026: कांचनताई बुटाला यांना 'महाराष्ट्र रत्न गौरव पुरस्कार' प्रदान

SCROLL FOR NEXT