Mumbai Accident Saamtv
मुंबई/पुणे

Mumbai Accident: भरधाव वेगाने घेतला बळी... फॉर्च्यूनरच्या धडकेत रिक्षाचालकाचा जागीच मृत्यू; कारचालक फरार

Fortuner Rickshaw Accident: या प्रकरणी समतानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून कारचालकाचा शोध सुरू आहे.

Gangappa Pujari

संजय गडदे, प्रतिनिधी...

Mumbai Accident: मुंबई कांदिवली परिसरातून एक भीषण अपघाताची घटना समोर आली आहे. मुंबईच्या कांदिवली ठाकूर व्हिलेजमध्ये भरधाव फॉर्चूनरने धडक दिल्याने रिक्षाचालकाचा जागीच मृत्यू झाला. शुक्रवारी (१, सप्टेंबर) रात्री २ वाजता ही दुर्देवी घटना घडली. (Kandivali Rickshaw Accident)

याबाबत सविस्तर माहिती अशी की, मुंबईच्या (Mumbai) कांदिवली ठाकूर व्हिलेजमध्ये रात्री दोनच्या सुमारास भरधाव वेगाने जात असलेली फॉर्च्युनर कारने रिक्षाला जोरदार धडक दिली. या धडकेत रिक्षाचालकाचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर कारचालक घटनास्थळावरुन फरार झाला.

ही धडक इतकी भीषण होती की रिक्षाचा चक्काचूर झाला. याबाबतची माहिती मिळताच समता नगर (Samata Nagar Police) पोलिसांनी घटनास्थळावर धाव घेतली. या प्रकरणी समतानगर पोलिसांनी अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल केला असून आरोपी कार चालकाचा सध्या शोध सुरू आहे.

दरम्यान, दोन दिवसांपूर्वी बिहारमध्येही एक भीषण अपघात घडला होता. भरधाव स्कॉर्पिओने ट्रकला धडक दिल्याने हा अपघात झाला. यामध्ये एकाच कुटूंबातील सात जणांचा मृत्यू झाला. वारंवार सुचना देवूनही वेगावर नियंत्रण नसल्याने असे अपघात होत असल्याचे समोर आले आहे. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Famous Actor : प्रसिद्ध अभिनेत्याला मुंबईतून अटक; महिलेसोबत नको ते कृत्य केलं, नंतर...

Mumbai News: मुंबई महानगर पालिकेत मोठा प्रशासकीय फेरबदल, ८०० अभियंत्यांची तडकाफडकी बदल्या

Maharashtra News Live Update: दुष्काळग्रस्त भागांसाठी राज्य सरकार पावले उचलेल : सुनील तटकरे

महिलांनो! वजन लय वाढलंय? Weight Loss करण्यासाठी 'या' सवयी लगेच सोडा

Health Tips: दुप्पट वेगाने कमी होईल वजन; आहारात फक्त या एका गोष्टीचा करा समावेश, ३२ वरून २८ होईल कंबर

SCROLL FOR NEXT