Mumbai Accident News Saam Tv
मुंबई/पुणे

Best Bus Accident : बेस्ट बसला भीषण अपघात; पुढच्या भागाचा चक्काचूर, ब्रिजवर नेमकं काय घडलं?

Mumbai Accident News : मुंबईतील मुलुंड-ऐरोली पुलावर बेस्ट बस आणि टेम्पोची समोरासमोर धडक होऊन सात जण जखमी झाले. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Alisha Khedekar

मुंबईतील ऐरोली पुलावर बेस्ट बस आणि टेम्पोचा भीषण अपघात

या अपघातात सात जण जखमी झाले असून दोन प्रवासी रुग्णालयात दाखल आहेत

अपघात सकाळी १२:३५ च्या सुमारास घडला

पोलिसांनी गुन्हा दाखल करून अपघाताचा तपास सुरू केला

मुंबईत बेस्ट बसचा भीषण अपघात झाला आहे. मुलुंड - ऐरोली पुलावर बेस्ट बस आणि टेम्पो यांच्यात जोरदार धडक झाली. या धडकेत सात जण जखमी झाले आहेत. या घटनेने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ठाण्यातील भूमी एकर्स ते मजास डेपो या मार्ग क्रमांक ४९२/३१ वर चालणारी बस भांडुपहून वाशीकडे जात होती. याचवेळेस समोरून येणाऱ्या भरधाव बेस्ट बसला टेम्पोने धडक दिली. ही घटना सकाळी १२ वाजून ३५ मिनिटांच्या सुमारास घडली. या अपघातात ७ जण गंभीर जखमी झाले आहेत.

बस अधिकाऱ्याने म्हटल्याप्रमाणे, या भीषण अपघातात बसमधील दोन प्रवासी आणि टेम्पोमधील ७ प्रवासी जखमी झाले. बसमधील एका प्रवाशाला आणि टेम्पोमधील एका प्रवाशाला वीर सावरकर रुग्णालयात दाखल करण्यात आले, तर उर्वरित पाच जणांवर प्राथमिक उपचार करण्यात आले आणि नंतर त्यांना घरी सोडण्यात आले, असे बेस्ट अधिकाऱ्यांनी सांगितले.

या दुर्घटनेत जखमी झालेल्या व्यक्तींची नावे, सागर राजाराम जाधव, आनंदकुमार साईराम शर्मा , दुर्गादास नागेश देवकर, राजेश कुमार मिथाइलाल जैस्वाल, गुलाब चिनीलाल जैस्वाल, संजय श्यामलाल जैस्वाल, बेचेनलाल, बेचेनलाल जैस्वाल, बेचेनलाल जयस्वाल अशी जखमींची नावे आहेत. यातील दोघांना तातडीने मुलुंड येथील वीर सावरकर रुग्णालयात दाखल करण्यात आले. दरम्यान या अपघाताप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस या घटनेचा तपास घेत असून यात नेमकी चूक कोणाची याबाबत अद्यापही स्पष्टीकरण आलेलं नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

KDMC Mayor: मोठी बातमी! कल्याण-डोंबिवलीत महापौर शिंदेसेनेचा, मनसेने दिला पाठिंबा

Maharashtra Live News Update: छत्रपती संभाजीनगरमध्ये ठाकरेंचे राजेंद्र राठोड यांचा जिल्हाप्रमुख पदाचा राजीनामा

Sanjay Raut: शिंदेंना दिल्लीत जाऊन गुजराती नेत्यांच्या पायाशी बसावं लागतं, संजय राऊत यांची खरपूस टीका

Mumbai Bellasis Bridge : मुंबईकरांसाठी खुशखबर! मुंबई सेंट्रलमधील 'तो' ब्रिज सोमवारी होणार खुला, वाहतूककोंडी होणार कमी

Nagarsevak Salary: तुमच्या शहरातील नगरसेवकांचा पगार किती असतो?

SCROLL FOR NEXT