मुंबईमध्ये भीषण रस्ते अपघाताची घटना घडली. बीएमडब्ल्यू कारने एका महिलेला धडक दिली. या अपघातामध्ये गंभीर जखमी झालेल्या महिलेचा जागीच मृत्यू झाला. ही घटना वांद्रे पश्चिम येथील पश्चिम द्रुतगती महामार्गावर घडली. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने आरोपीचा शोध घेतला आणि त्याला अटक केली. पोलिस सध्या तपास करत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, १६ नोव्हेंबर रोजी मध्यरात्री पावणे एकच्या सुमारास विद्युत पोल क्रमांक २३ जवळ ही अपघाताची घटना घडली. निळ्या रंगाच्या बीएमडब्ल्यू कारने एका महिलेला जोरदार धडक दिली. अपघातानंतर चालक महिलेला मदत न करता घटनास्थळावरून फरार झाला. सुरुवातीला मृत महिलेची ओळख पटली नव्हती. पण पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवत आरोपीचाही शोध घेतला आणि मृत महिलेची ओळखही पटवली. मृत महिलेचे नाव फातिमा नासिर खान (वय ४५ वर्षे०) असे होते. ती कुर्ल्यातील कसईवाडा येथे राहत होती.
पोलिसांनी साक्षीदारांचे जबाब आणि सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपीचा शोध घेतला. पराग कुवरसिंह छेडा (वय ५० वर्षे) असं आरोपी कार चालकाचे नाव आहे. आरोपी व्यवसायाने ज्वेलर्स आहे. त्याला पोलिसांनीसांताक्रूझ पश्चिम येथून आरोपीला अटक करण्यात आली. ७ नोव्हेंबर रोजी आरोपीला न्यायालयात हजर केले असता न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. त्यानंतर आरोपीच्या वकिलांनी जामिनासाठी अर्ज केला. न्यायालयाने आरोपीची जामिनावर सुटका केली.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.