Lalbaugcha Raja News Saam TV
मुंबई/पुणे

लालबागचा राजाच्या दानपेटीत धक्कादायक पत्र; सुरक्षा रक्षकाच्या दादागिरीमुळे मुलीची आत्महत्या

लालबागचा राजा जेवढा आपल्या भक्तांच्या गर्दीमुळे प्रसिद्ध झाला आहे. तेवढाच मंडळाच्या काही गैरवर्तणूक करणाऱ्या सुरक्षा रक्षकांमुळे वादग्रस्त देखील ठरला आहे.

Jagdish Patil

रुपाली बडवे -

मुंबई: लालबागचा राजा (Lalbaugcha Raja) जेवढा आपल्या भक्तांच्या गर्दीमुळे प्रसिद्ध झाला आहे. तेवढाच मंडळाच्या काही गैरवर्तणूक करणाऱ्या कार्यकर्त्ते आणि सुरक्षारक्षकांमुळे वादग्रस्त देखील ठरला आहे. लालबागच्या राजावर असणाऱ्या श्रद्धेपोटी लाखो लोक दर्शनाला येत असतात.

तासंतास दर्शन रांगेत भाविकांना थांबाव लागतं. मात्र, या दर्शन रांगेतील त्रास झाल्याने एका मुलीने तेथील सुरक्षारक्षकाकडे मदत मागितली, त्याने उद्धट आणि विचित्र उत्तर दिल्याने एका मुलीने गळफास घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.

महत्वाची बाब म्हणजे ही घटना लालबागच्या राजाच्या दानपेटीमधूनच उघड झाली आहे. आज सकाळपासून लालबागच्या राज्याच्या चरणी भाविकांनी अर्पण केलेल्या निधी आणि दागिन्याची मोजणी सुरु केली आहे. यावेळी दानपेटीमधून एक पत्र मिळालं असून या पत्रामध्ये एका आईने आपल्या मुलीचा जीव तेथिल सुरक्षरक्षकांच्या असंवेदनशील वर्तवणुकीमुळे गेला असल्याचा दावा केला आहे.

पाहा व्हिडीओ -

दानपेटीमधून समोर आलेल्या पत्रामध्ये सन २०१९ मध्ये ८ तास रांगेत थांबलो सुरक्षारक्षकाने (Security Guard) चुकीचं वर्तन केल्यामुळे मुलीने आत्महत्या केल्याचं मुलीच्या आईने म्हटलं आहे. पत्रात (Letter) लिहलं आहे की, करोना संकटानंतर लालबागचा राजा येत आहे पण त्याच्या दर्शनाची आस असलेली माझी मुलगी आज आता या जगात नाही.

२०१९ साली लालबागच्या राजाच्या नवसाच्या रांगेत मी आणि माझी मुलगी ८ तास उभे होतो. मात्र, दर्शन रांग जराही पुढे न सरकल्याने तिचे पाय खूप दुखू लागल्याने तिला रांगेत उभे राहाणे अशक्य झाले.

तेव्हा ती जवळ असणाऱ्या एका सिक्युरिटी गार्डशी बोलायला गेली. तिथे त्याने तिच्या मनाला लागेल अशी काहीतरी चुकीची भाषा वापरून विचित्र उत्तरे दिली. ते ऐकूनच संतापलेल्या माझ्या मुलीने मला रांगेतून बाहेर काढून दर्शनासाठी न थांबताच पहाटेच घरी परत नवी मुंबईला आणले. तिचे मानसिक संतुलन बिघडले आणि त्याच दिवशी संध्याकाळी गळफास लावून स्वतःला संपवले.

वरील कोपऱ्यातील चित्र माझ्या आर्किटेक्ट मुलीची शेवटची आठवण ठरले. जे तिने नवसाच्या रांगेत बसूता यावे म्हणून काढले ते तिला राजाच्या पेटीत ठेवायचे होते. कार्यकारी मंडळ नवसाच्या पेटीतील योग्य सूचनेप्रमाणे कृती नक्की करते हा तिचा विश्वास होता. ही तिची इच्छा शेवटची ठरली. म्हणून आम्ही ते बाप्पाच्या चरणी वाहातो.

ती पुर्ण करण्यासाठी आपण आम्हाला यावर्षी नाहीतर पुढच्या वर्षी नाहीतरपुढच्या वर्षी बाक /खुर्च्या देऊ दयाल तर तिच्या दिवंगत आत्म्याला शांती मिळेल अशी आमची भाबडी समजूत. मुलीचे दुःखी आई वडील बहीण.'

या पत्रामुळे पुन्हा एकदा लालबागच्या राजाच्या दर्शन रांगेत आणि मंडपामधील भाविकांशी केल्या जाणाऱ्या गैरवर्तनाबाबतचा मुद्दा उपस्थित झाला आहे. शिवाय यंदाच्या गणेशोत्सवाच्या पहिल्याचं दिवशी सुरक्षारक्षक आणि एका महिलेचा वाद झाला होता. यामध्ये दोघींमध्ये मारहाण देखील झाली होती.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Horoscope: जुन्या मित्रांची होईल भेट, जोडीदाराचा सुटेल अबोला; जाणून घ्या तुमची राशीत आहे काय?

Assembly Election: राज्यात जातीवर आधारित मतदान नाही; अजित पवारांच्या विधानाने महायुतीला टेन्शन

Horoscope : तुम्हाला अचानक… राशीत काय? चांगलं की वाईट?

India vs South Africa: वर्ल्ड चॅम्पियन्सचा नाद करायचा नाय! भारताचा द.आफ्रिकेवर मोठा विजय; ३-१ ने मालिका जिंकली

IND vs SA: पैसा वसूल मॅच! संजू - तिलकची शतकं; भारताने उभारला रेकॉर्ड ब्रेकिंग स्कोअर

SCROLL FOR NEXT