Mumbai News Updates in Marathi: मुंबईकरांना आता संपूर्ण शहर एका तासात प्रवास करता येईल, कारण मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (MMRDA) 90.18 किलोमीटर अतिरिक्त रस्ते बांधण्याची योजना आखली आहे. MMRDA ने शहरात सात रिंग रोडच्या प्रोजेक्टसाठी प्रस्ताव पाठवलेला आहे. या प्रस्तावाचा अंदाजे खर्च ₹58,517 कोटी असेल, असे Indian Express च्या अहवालात नमूद केले आहे. या योजनेमुळे "मॅक्सिमम सिटी" मध्ये प्रवासाचा कालावधी एका तासात कमी होईल, अशी अपेक्षा आहे.
या प्रकल्पात मेट्रो, पूल, फ्लायओव्हर आणि झोपडपट्टी पुनर्वसन यासारख्या पायाभूत सुविधांचे प्रकल्प समाविष्ट असून प्रकल्पासाठी अंदाजे 3 लाख कोटी रुयये खर्च अपेक्षित आहे. या रिंग रोडची निर्मिती पूर्व-पश्चिम भागातील वाहतूक सुधारण्यासाठी करण्यात येणार आहे. त्यामुळे शहरातील उत्पादनक्षमता वाढण्यास मदत होणार आहे.Indian Express ने यासंदर्भातील अहवाल प्रसिद्ध केला आहे.
स्थान: नरीमन पॉईंट-कोस्टल रोड-वर्ली सेवरी कनेक्टर-ईस्टर्न फ्रीवे-ऑरेंज गेट बोगदा-नरीमन पॉईंट
मार्ग: हा मार्ग नरीमन पॉईंटपासून सुरु होईल आणि वर्ली जंक्शनवर बांद्रा सी लिंकपर्यंत जाणार आहे. बांद्रा-वर्ली सी लिंकवरून उजवीकडे वळून सेवरी-वर्ली कनेक्टरकडे जाईल, जो अटल सेतूच्या दक्षिण टोकाला जोडण्यात येणार आहे. हा रस्ता नंतर नियोजित ऑरेंज गेट बोगद्यातून जाईल आणि कोस्टल रोडमार्गे नरीमन पॉईंटला जोडण्यात येणार आहे.
स्थान: नरीमन पॉईंट-बांद्रा वर्ली सी लिंक-डब्ल्यूईएच-सांताक्रूझ चेंबूर लिंक रोड-ईईएच-ईस्टर्न फ्रीवे-ऑरेंज गेट बोगदा-नरीमन पॉईंट
मार्ग: दुसरा रिंग रोड नरीमन पॉईंटपासून सुरू होईल, ज्यामध्ये मुंबई कोस्टल रोड, बांद्रा-वर्ली सी लिंक आणि पश्चिम द्रुतगती महामार्ग (डब्ल्यूईएच) च Santacruz Junction पर्यंत जोडला जाईल. संताक्रूझ-चेंबूर लिंक रोड (SCLR) पूर्व द्रुतगती महामार्गाशी (ईईएच) जोडला जाईल, जो ऑरेंज गेट बोगद्यापर्यंत पोहोचेल आणि नरीमन पॉईंटला परत येईल.
स्थान: नरीमन पॉईंट-बांद्रा वर्ली सी लिंक-डब्ल्यूईएच-जेव्हीएलआर-कांजूरमार्ग जंक्शन-ईस्टर्न फ्रीवे विस्तार-ईस्टर्न फ्रीवे-ऑरेंज गेट बोगदा-नरीमन पॉईंट
मार्ग: हा रिंग रोड नरीमन पॉईंटपासून सुरू होईल, बांद्रा-वर्सोवा लिंक आणि जोगेश्वरी-व्हिक्रोळी लिंक रोडशी जोडले जाईल. त्यानंतर, तो पवई-कांजूरमार्ग जंक्शनपर्यंत जाईल आणि पूर्व द्रुतगती फ्रीवेकडे (ईस्टर्न फ्रीवे) जाईल.
स्थान: नरीमन पॉईंट-बांद्रा वर्ली सी लिंक-वर्सोवा बांद्रा सी लिंक-वर्सोवा दहिसर लिंक रोड-गोरेगाव मुलुंड लिंक रोड-ईस्टर्न फ्रीवे विस्तार-ईस्टर्न फ्रीवे-ऑरेंज गेट बोगदा-नरीमन पॉईंट
मार्ग: चौथा रिंग रोड नरीमन पॉईंटपासून सुरू होईल आणि वर्सोवा-दहिसर लिंक रोडला जोडला जाईल, ज्यामुळे गोरेगाव-मुलुंड लिंक रोडपर्यंत पोहोचेल.
स्थान: नरीमन पॉईंट-बांद्रा वर्ली सी लिंक-वर्सोवा दहिसर लिंक रोड-भायंदर-फाऊंटन हॉटेल कनेक्टर-घोडबंदर बोगदा-ठाणे किनारपट्टी रोड-आनंद नगर-साकेत फ्लायओव्हर-ईस्टर्न फ्रीवे-ऑरेंज गेट बोगदा-नरीमन पॉईंट
मार्ग: वर्सोवा-दहिसर लिंक रोडने भायंदरमार्गे ठाण्यापर्यंत असले आणि घोडबंदरमार्गे ऑरेंज गेट बोगद्याला जोडण्यात येईल.
स्थान: नरीमन पॉईंट-वर्सोवा बांद्रा सी लिंक-मिरा भायंदर लिंक रोड-अलिबाग विरार कॉरिडोर-ठाणे किनारपट्टी रोड-आनंद नगर-साकेत फ्लायओव्हर-ईस्टर्न फ्रीवे-ऑरेंज गेट बोगदा-नरीमन पॉईंट
मार्ग: हा रिंग रोड मिरा-भायंदर लिंक रोडला जोडेल आणि उत्तर भागातील प्रमुख ठिकाणांमा जोडला जाईल.
स्थान : नरीमन पॉईंट-वर्सोवा दहिसर भायंदर लिंक रोड-उत्तान लिंक रोड-वडोदरा मुंबई एक्सप्रेसवे-अलिबाग विरार मल्टी मॉडेल कॉरिडोर-ऑरेंज गेट बोगदा-नरीमन पॉईंट
मार्ग : हा बाह्य रिंग रोड वडोदरा-मुंबई एक्सप्रेसवे आणि अलिबाग-विरार मल्टी-मॉडेल कॉरिडोरला जोडण्यात येणार आहे. त्यामुळे मुंबईबाहेचा प्रवासही जलद आणि सोपा होणार आहे.