21-Year-Old Student Dies After Falling from Sathaye College in Mumbai; Investigation Underway Google
मुंबई/पुणे

Mumbai : साठ्ये महाविद्यालयात २१ वर्षीय विद्यार्थिनीची आत्महत्या, तिसर्‍या मजल्यावरून मारली उडी

Sathaye College student suicide in Mumbai : मुंबईतील साठ्ये महाविद्यालयात तिसऱ्या मजल्यावरून उडी मारून २१ वर्षीय विद्यार्थिनीने आत्महत्या केल्याची घटना घडली. मृत संध्या पाठकच्या पालकांनी तिच्या मृत्यूत संशय व्यक्त केला असून, पोलिसांकडून तपास सुरू आहे.

Namdeo Kumbhar

Mumbai Sathaye College death case full update : मुंबईतील विलेपार्ले येथील साठ्ये महाविद्यालयात एका विद्यार्थिनीने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. तिसऱ्या वर्षात शिकणाऱ्या २१ वर्षीय संध्या पाठक हिने तिसऱ्या मजल्यावरून उडी मारत आत्महत्या केली. संध्या पाठक हिने टोकाचे पाऊल का उचलले, याचा तपास पोलिसांकडून कऱण्यात (Was it suicide or murder at Vile Parle college?) येत आहे. दरम्यान, संध्या पाठक हिने आत्महत्या केली नसल्याचा संशय तिच्या पालकांना आहे. संध्याला तिसऱ्या मजल्यावरून कुणीतरी धक्का दिला, त्यामुळे तिचा मृत्यू झाला असावा, असा आरोप पालकांनी केला आहे. पण महाविद्यालयाने ही आत्महत्याच असल्याचे स्पष्ट केले आहे.

साठ्ये महाविद्यालयाच्या इमारतीवरून आज सकाळी (गुरूवारी) संध्या पाठक (Sathaye College suicide) हिने उडी मारल्याची घटना समोर आली. संध्याच्या आत्महत्येची माहिती (Student jumps from third floor of Mumbai college) विलेपार्ले परिसरात खळबळ उडाली. तिसऱ्या वर्षात शिकणाऱ्या २१ वर्षीय संध्या पाठक हिने का उडी मारली? ही आत्महत्या होती की हत्या? याचा तपास पोलिसांकडून करण्यात येत आहे. संध्या पाठक हिच्या मित्र आणि मैत्रिणींची चौकशी पोलिसांकडून करण्यात येत आहे.

संध्या पाठक हिने आत्महत्या केली किंवा ती पडली, याबाबत अद्याप संभ्रम आहे. साठ्ये महाविद्यालय प्रशासनाने संध्याच्या कुटुंबीयांना ती तिसऱ्या मजल्यावरुन पडली आणि तिचा मृत्यू झाल्याचे सांगितले. संध्या पाठक हिने आत्महत्याच केली असेल, अशी चर्चा साठ्ये कॉलेजमध्ये रंगली आहे. विलेपार्ले पोलिसांकडून या प्रकरणाचा कसून तपास केला जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Yogesh Kadam : आधी पुण्यातील गुन्हेगारीचा आलेख वाचला; नंतर गृहराज्यमंत्र्यांनी गुन्हे रोखण्याचा सरकारचा 'राणबाण उपाय'च सांगितला

Akola Shocking : दिवसभर ५ वर्षांचा चिमुकला बेपत्ता, नंतर सांडपाण्याकडे लक्ष गेलं; दृश्य पाहून कुटुंब हादरलं

Raj Thackeray : महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री हिंदीसाठी का भांडतोय? राज ठाकरेंचा थेट सवाल

Raj Thackeray : 'मुंबईतल्या समुद्रात डुबे डुबे के मारेंगे'; राज ठाकरेंची भाजप खासदार निशिकांत दुबेंना वार्निंग

Ganapati Special Trains : चाकरमान्यांसाठी आनंदाची बातमी, गणेशोत्सवानिमित्ताने मध्य रेल्वे चालवणार २५० विशेष गाड्या

SCROLL FOR NEXT