Mumbai : पांडवकडा धबधब्यावर अडकलेल्या 17 तरुणांची सुटका ! विकास मिरगणे
मुंबई/पुणे

Mumbai : पांडवकडा धबधब्यावर अडकलेल्या 17 तरुणांची सुटका !

विकास मिरगणे

खारघर : पांडवकडा धबधब्यावर पाण्याच्या प्रवाहात अडकलेल्या 17 तरुणांची शिडीच्या सहाय्याने अग्निशमन जवानांनी सुटका केली आहे. तर, नियम धाब्यावर बसुन धबधब्यावर जाणाऱ्या सर्व तरुणांवर पोलिसांनी योग्य ती कारवाई करण्याची मागणी स्थानिकांनी केली आहे. हे सर्व तरुण गोवंडी, धारावी आणि वडाळा येथील आहेत. खारघर परिसरातील पांडवकडा धबधब्यावर खोल पाण्याचा अंदाज येत नसल्यामुळे अनेक पर्यटक बुडून मरण पावल्याच्या घटना घडल्या आहेत.

हे देखील पहा :

पांडवकडा धबधब्यावर प्रवेशबंद असल्याचे फलक खारघर पोलिसांनी लावले आहेत. दोन महिन्यापूर्वी गोवंडी येथील एका तरुणाचा धबधब्यावर बुडून मृत्यू झाला होता. तर ऑगस्ट महिन्यात सेक्टर पाच येथील धबधब्यावर अडकलेल्या 138 पर्यटकांची सुटका अग्निशमन जवान आणि खारघर पोलिसांनी केली होती. दरम्यान, आज सकाळ पासून पाऊस असल्यामुळे हे सर्व तरूण दुपारी पांडवकडा धबधब्यावर आनंद घेण्यासाठी पोहचले. सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास झालेल्या मुसळधार पावसामुळे हे सतरा तरुण धबधब्यावर दुथडी भरून वाहणाऱ्या ओढ्याच्या पलीकडील बाजूस अडकले.

पांडवकडा धबधब्यावरून गोल्फ कोर्स कडे जाणारा ओढा दुथडी भरून वाहत असल्यामुळे दुसऱ्या बाजूला काही तरुण अडकल्याची माहिती खारघर अग्निशमन जवानांस मिळताच अग्निशमन विभागात कार्यरत असलेले आर एच वाल्मिकी हे अग्निशमन जवानांचे पथक घेऊन या ठिकाणी पोहचले. या सर्व तरुणांस सुखरूप बाहेर काढले. यातील बहुतांश तरुण हे 17 व 18 वर्षाखालील आहेत.

Edited By : Krushnarav Sathe

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

PM Modi In Thane: मराठी, मेट्रो अन् मविआ; ठाण्यात PM मोदींची विरोधकांवर चौफेर टीका

Pune Devi Temple : मुंबईपासून हाकेच्या अंतरावर आहे जम्मूच्या वैष्णो देवी मंदिराची प्रतिकृती

VIDEO : उद्धव ठाकरेंचा मोदी-शिंदेंवर 'ठाकरी बाण'

Marathi News Live Updates : काँग्रेसची ज्या राज्यात सत्ता येते ती राज्य उध्वस्त होतात, नरेंद्र मोदी

Fashion Tips : बॅगी जीन्ससोबत ट्राय करा 'हे' टॉप्स, फॅशन ट्रेंडमध्ये दिसाल स्टायलिश!

SCROLL FOR NEXT