CM Eknath Shinde On Ladki Bahin Yojana Saam Tv
मुंबई/पुणे

Ladki Bahin Yojana : '...तर 1500 चे 3000 रुपये होतील', मुख्यमंत्री शिंदे यांचं मोठं वक्तव्य

CM Eknath Shinde On Ladki Bahin Yojana : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' योजनेबद्दल मोठं वक्तव्य केलं आहे.

Satish Kengar

सागर आव्हाड, साम टीव्ही, प्रतिनिधी

''तुम्ही जर आम्हाला पाठबळ दिले, तर दीड हजारांचे दोन हजार होतील, अडीच आणि तीन हजार देखील होतील. आम्हाला तुमची ताकत मिळाली तर तीन हजारांच्या पुढेही आम्हाला देता येतील'', असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबद्दल बोलताना म्हणाले आहेत. आज पुण्यातील बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल येथे 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' योजनेचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते शुभारंभ झाला. यावेळी बोलताना ते असं म्हणाले आहेत.

यावेळी बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले आहेत की, ''सरकार चालवताना आम्हाला कसरत करावी लागते. विरोधक म्हटलेत बहिणीचे ठीक पण, लाडक्या भावाचे काय? कधी भावाचा विचार केला का यांनी? मात्र आम्ही लाडक्या भावासाठीही, योजना आणली. काहीजण म्हटले चुनावी जुमला आहे का? महिलांना विकत घेता का? काही बोलायला लागलेत, असं बोलताना लाज नाही का वाटत ?'', असं म्हणत शिंदे यांनी विरोधकांवर हल्लाबोल केला आहे.

शिंदे म्हणाले, ''सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलेल्याना दीड हजारांचे महत्त्व कळणार आहे का? आता कुणासमोर हात पसरावे लागणार नाही. ते रोज टीका करत आहेत, शिव्या शाप देत आहेत. हे सरकार आज पडणार उद्या पडणार म्हणत होते, उलट अजितदादा आल्यावर हे सरकार अधिक मजबूत झालं.''

सप्टेंबर महिन्यात अर्ज केल्यासही मिळणार तीन महिन्यांचे पैसे

ज्या महिला आता नव्याने या योजनेसाठी अर्ज करणार आहेत, त्यांनी सप्टेंबर महिन्यात अर्ज भरला तरी त्यांना तीन महिन्याचे पैसे मिळणार, अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.

महाविकास आघाडीवर टीका करत शिंदे म्हणाले की, ''50 वर्ष तुमचं सरकार होतं, अडीच वर्ष महाविकास आघाडी सरकार होते, या महिलांना एक रुपया तरी दिला का? देव मंदिरात नाही, देव देव्हऱ्यात नाही, देव माणसात आहे, हे मानणारा मी आहे.''

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Nagar Parishad Live : जालना जिल्ह्यातील नगरपालिका मतदान टक्केवारी

Kalyan News: शहरात एकाच नंबरच्या दोन रिक्षा; दंड ठोठावल्यानंतर झाला कल्याणमधील बनावट नंबरप्लेटचा पर्दाफाश

Local Body Election: पैसे वाटणाऱ्या शिवसेना शिंदे गटाच्या कार्यकर्त्याला पकडलं; संतप्त नागरिकांनी मतदान केंद्राबाहेरच चोपलं

Santosh Bangar : संतोष बांगर वादाच्या भोवऱ्यात; निवडणूक अधिकाऱ्यांकडून गुन्हा दाखल, आमदारांनी काय केलं?

भारतात लवकरच लाँच होणार धमाकेदार Realme आणि Redmi चे फोन , फीचर्स आहेत शानदार

SCROLL FOR NEXT