Mukesh Ambani's Residence Antilia Adorned Ahead of Ram Temple Saam Tv
मुंबई/पुणे

Mukesh Ambani House: मुकेश अंबानींचे घर अँटिलिया झालं राममय, पाहा सुंदर PHOTO

Mukesh Ambani Antilia House: सोमवारी श्रीरामाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना होणार आहे. उद्योगपती मुकेश अंबानी आणि त्यांच्या कुटुंबीयांनाही या कार्यक्रमात सहभागी होण्याचे निमंत्रण देण्यात आले आहे.

Satish Kengar

Mukesh Ambani's Residence Antilia Adorned Ahead of Ram Temple:

सोमवारी अयोध्येतील राम मंदिरात श्रीरामाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना होणार आहे. उद्योगपती मुकेश अंबानी आणि त्यांच्या कुटुंबीयांनाही या कार्यक्रमात सहभागी होण्याचे निमंत्रण देण्यात आले आहे. यातच प्राणप्रतिष्ठेच्या एक दिवस आधी जिथे संपूर्ण देश राममय झालं आहे, तिथे मुकेश अंबानींचा भव्य अँटिलियाही रामाच्या रंगात रंगला आहे.

अंबानी यांच्या घराचे फोटो फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यात अँटिलियाची खास सजावट बघायला मिळते. घर रंगीबेरंगी दिवे आणि पुष्पगुच्छांनी सजवले गेले आहे. तसेच इमारतीच्या वरच्या बाजूला राम मंदिराच्या फोटोसोबत जय श्रीराम लिहिलेले दिसत आहे.  (साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

दरम्यान, मुकेश अंबानी यांचे घर अँटिलिया जगातील सर्वात महागड्या आणि सुरक्षित इमारतींमध्ये गणले जाते. मुंबईतील अल्टामाऊंट रोडवर असलेली ही 27 मजली इमारत आहे.  (Latest Marathi News)

याचा प्रत्येक मजला सुमारे दोन मजली उंची इतका आहे. यामध्ये सुमारे 600 कर्मचारी काम करतात. या घरात हेलिपॅड, स्पा, योगा सेंटर आणि स्विमिंग पूल देखील आहे.

रिलायन्स इंडस्ट्रीच्या कर्मचाऱ्यांनाही सुट्टी

श्रीराम प्राणप्रतिष्ठानिमित्त केंद्र सरकारने अर्धा दिवस सुट्टी जाहीर केली आहे. यातच मुकेश अंबानी यांनीही आपल्या कर्मचाऱ्यांना दिवसभर सुट्टी जाहीर केली आहे. अंबानी यांच्याकडून 22 जानेवारी रोजी रिलायन्स इंडस्ट्रीजच्या कर्मचाऱ्यांना सुट्टीची भेट देण्यात आली आहे. शुक्रवारीच मुकेश अंबानी यांनी राम मंदिर प्राणप्रतिष्ठेच्या दिवशी सर्व कर्मचाऱ्यांना सुट्टी असेल असे जाहीर केले होते.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sharad Pawar News: शरद पवारांचे अजित पवारांबाबत मोठे वक्तव्य; काकांकडून पुतण्याच्या कौतुकाचं गूढ काय?

Maharashtra Election : ऐन निवडणुकीत भाजपकडून ४० जणांची हकालपट्टी, बंडखोरांना दाखवला घरचा रस्ता!

Matru Vandana Yojana: गर्भवती महिलांना मिळतात ६००० रुपये; केंद्राची मातृत्व वंदना योजना नक्की आहे तरी काय?

Viral Video: प्रवाशांची हातापायी आता थांबणार, प्रवाशाने ट्रेनमध्ये बसण्यासाठी शोधला अजबच जुगाड; पाहा व्हायरल VIDEO

Maharashtra Election : ठाकरेंच्या शिवसेनेत मोठा भूकंप, ५२ पदाधिकाऱ्यांचा जय महाराष्ट्र, भाजपला जाहीर पाठिंबा!

SCROLL FOR NEXT