ST bus service Saam tv
मुंबई/पुणे

ST Bus : एसटी महामंडळाची नवी योजना, २७ सप्टेंबरपासून होणार सुरू, तिकिट किती?

MSRTC Shaktipeeth Darshan bus ticket price Navratri 2025 : शक्तीपीठ दर्शनासाठी एसटी बस सेवा २७ सप्टेंबरपासून पुणे विभागाकडून सुरू होणार आहे. कोल्हापूर महालक्ष्मी, तुळजापूर तुळजा भवानी, माहूर रेनुका देवी आणि नाशिक सप्तशृंगी देवी या साडेतीन शक्तीपीठांचे दर्शन होईल.

Namdeo Kumbhar
  • २७ सप्टेंबरपासून पुणे विभागातून शक्तीपीठ दर्शनासाठी एसटी बस सेवा सुरू

  • भाविकांना कोल्हापूर, तुळजापूर, माहूर आणि सप्तशृंगी देवीचे दर्शन घडवले जाणार

  • महिलांसाठी आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी ५०% सवलतीचे तिकीट दर लागू

  • नवरात्रोत्सव काळात सप्तशृंगी गडावर खासगी वाहतूक बंद, फक्त एसटी बससेवा उपलब्ध

Shaktipeeth Darshan ST Bus : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाकडून (MSRTC) नवरात्रोत्सवादरम्यान भाविकांसाठी नवीन योजना आणली आहे. शक्तिपीठ दर्शनासाठी २७ सप्टेंबरपासून एसटी महामंडळाकडून ही सोय करण्यात आली आहे. भाविकांना साडेतीन शक्तिपीठांच्या दर्शनाकरिता पुणे विभागातून विशेष बस सोडण्यात येणार आहेत. एसटीची ही नवीन योजना नक्की आहे तरी काय? तिकिट किती असणार? कोणत्या बस स्टँडवरून बस निघणार? याबाबत सविस्तर जाणून घेऊयात.

नवरात्रोत्सवामध्ये पुणे विभागाकडून २७ सप्टेंबरपासून एसटीची शक्तिपीठ दर्शन सेवा सुरू करण्यात आली आहे. शिवाजीनगर, स्वारगेट आगारातून सकाळी सात वाजता बस निघणार आहे. सध्या ३० पेक्षा जास्त जणांनी बुक केले आहे. प्रवासी वाढले, तर त्याप्रमाणे बस सोडण्यात येणार आहे. प्रवासी कोल्हापूर महालक्ष्मी, तुळजापूर (तुळजा भवानी), माहूर (रेणुका देवी), आणि नाशिक सप्तशृंगी मंदिराचे दर्शन करतील. पुरुषांचे प्रवासी भाडे ₹३१०१ आणि महिलांचे ₹१५४९ ठेवण्यात आले आहे. महिलांना व ज्येष्ठ नागरिकांना ५०% सवलत दिली जाईल. सुरक्षित आणि सुखकर प्रवासासाठी अधिक भाविकांनी सेवा वापरण्याचे एसटीने आवाहन केले आहे.

सप्तशृंगी देवीच्या दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांसाठी महत्त्वाची बातमी

नवरात्रोत्सव काळात साडेतीन शक्तीपीठांपैकी आद्यपीठ असलेल्या सप्तशृंगी देवीच्या दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांसाठी महत्त्वाची बातमी मिळाली आहे. नवरात्रोत्सवात २१ सप्टेंबर ते ६ ऑक्टोबरपर्यंत सप्तशृंग गडावरील खासगी वाहतूक बंद करण्यात आली आहे. नांदुरी ते सप्तशृंग गड खासगी वाहतूक बंद राहणार आहे. गडावर जाण्यासाठी असलेला घाट रस्ता छोटा असल्यानं वाहतूक कोंडी अथवा कुठलाही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी खबरदारी घेण्यात येणार आहे. नवरात्रोत्सवाच्या काळात नांदुरी ते सप्तशृंग गड केवळ एसटी बससेवा सुरू राहणार आहे. भाविकांच्या सोयीसाठी नांदुरी ते सप्तशृंग गड प्रवासासाठी एसटी प्रशासनाकडून २५० एसटी बसेसचं नियोजन करण्यात आलेय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: भुसावळ तालुक्यातील हातनुर धरणाचे १० दरवाजे उघडण्यात आले

CSMT Khau Galli : CSMT जवळच्या 'खाऊ गल्ली'ची जागा बदलणार, दुकानदारांना BMC च्या नोटिसा, कारण काय?

चमत्कारच! मृतदेह चितेवर ठेवला, अग्नी देण्यापूर्वीच महिलेनं केलं असं काही, सगळे हादरले!

Akola Crime : दगडाने ठेचून एकाची निर्घृण हत्या; मारेकरी मृतदेहाजवळ जाऊन झोपला, अकोला जिल्हा रुग्णालयातील घटना

Farah Khan: तुम्ही आणि सलमान खान एक सारखे...; फराह खानने का केली बाबा रामदेवची सलमान खानशी तुलना

SCROLL FOR NEXT