MPSC Exam Saam Tv
मुंबई/पुणे

MPSC Exam : आतापर्यंत ४ वेळा स्थगित, राज्यसेवा पूर्व परीक्षा कधी होणार? विद्यार्थ्यांचा सरकारला संतप्त सवाल, पत्र व्हायरल!

Rohini Gudaghe

सागर आव्हाड, साम टीव्ही पुणे

एमपीएससी परिक्षेसंदर्भात महत्वाची बातमी आहे. सलग चौथ्यांदा ढकलेली राज्यसेवा पूर्व परीक्षा आयोग कधी घेणार ? असा सवाल आता परीक्षांर्थीं विद्यार्थ्यांनी केलाय. आंदोलनाच्या दबावापोटी राज्यसेवा परीक्षा पुढे ढकलली पण पुढे काय? असं परिक्षार्थी विचारत असल्याचं समोर आलंय. पुण्यामध्ये एमपीएससी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी आंदोलन केलं होतं.

विद्यार्थी नेमकं म्हणतात काय?

पुढचे सलग चार महिने आयबीपीएसच्या परीक्षा या शनिवार, रविवारी होणारच (MPSC Student Protest News) आहेत. मग सलग चौथ्यांदा ढकलेली राज्यसेवा पूर्व परीक्षा आयोग घेणार कधी, असा खडा सवाल परीक्षा पुढे ढकलल्यामुळे नाराज झालेल्या विद्यार्थ्यांनी विचारलेला आहे. विद्यार्थ्यांनी आमदार अभिमन्यु पवार यांना उद्देशून वास्तव मांडणारं लिहिलेलं पञ व्हायरल होत आहे.

व्हायरल पत्रात काय लिहिलंय ?

आयबीपीएस परीक्षेचं कारण पुढे करून राज्यसेवा पूर्व परीक्षा लांबणीवर टाकली. पण खरंच 258 जागा आहे, त्या जाहिरातीत अॅड करता येणार आहेत का? तसंच आयबीपीएस आणि राज्यसेवा अशा दोन्ही परीक्षांना विद्यार्थी वर्ग कितीसा (MPSC Exam News) आहे? मग केवळ 'कृषी'च्या काही हजार परीक्षार्थींच्या दबावापोटी अडिच लाख परीक्षार्थींचं भवितव्य पुन्हा टांगणीला का?

आंदोलक आणि राजकीय दबावापोटी एमपीएससीच्या स्वायत्तेवरच घाला घातला जातोय का? वर्षभरात वेळापत्रक जाहीर होऊनही एमपीएससीची एकही परीक्षा होऊ शकलेली नाही. परीक्षा लांबल्याने परीक्षांर्थींचे वेळापञक कोलमडलं. खर्चही सोसवत नाहीये. विरोधात बोललं तर ट्रोलिंग सामना करावा (MPSC Exam Update)लागतो, असा उल्लेख पत्रामध्ये करण्यात आलाय. एमपीएससीच्या एका विद्यार्थ्याने निनावी लिहिलेलं हे पत्र सध्या खूप व्हायरल होत आहे.

पुढील दोन महिन्यातील परीक्षा वेळापत्रक

पुढील दोन महिन्यातील परीक्षा वेळापत्रक कसं असेल, ते आपण जाणून घेवू या. ३१ ऑगस्ट रोजी IBPS PSB CLERK ची परीक्षा होणार आहे. तर १ सप्टेंबर रोजी UPSC CDS ची परीक्षा होणार आहे. ७ सप्टेंबर रोजी गणपती बाप्पाचं आगमन होणार (Pune News) आहे. ९ सप्टेंबर ते २६ सप्टेंबर रोजी SSC CGLची परीक्षा होणार आहे. २० सप्टेंबर ते २९ सप्टेंबर रोजी UPSC CSE मुख्य परीक्षा आहे. २९ सप्टेंबर रोजी IBPS RRB SCALE 2 & 3ची परीक्षा होणार आहे.

६ ऑक्टोबर रोजी IBPS RRB OFFICE ASSISTANT ची परीक्षा होणार आहे. १२ ऑक्टोबर रोजी दसरा आहे. १३ ऑक्टोबर रोजी IBPS PSB CLERK MAINS ची परीक्षा होणार आहे. १९ ऑक्टोबर रोजी IBPS PO PRE ची परीक्षा होणार आहे. २० ऑक्टोबर IBPS PO PRE ची परीक्षा होणार आहे.२० ऑक्टोबरनंतर आचारसंहिता लागेल. मग त्यात काय वेळापत्रक असेल, निवडणुकीच ते आताच सांगता येत नाही.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Weather: गणेश विसर्जनानंतर राज्यात पावसाची एन्ट्री! आज 'या' भागात बरसणार, हवामान खात्याचा अंदाज; वाचा सविस्तर...

Today Horoscope : जुना अबोला मिटेल,घरात उत्साहाचे वातावरण राहील; वाचा आजचे राशीभविष्य

Horoscope Today : आज विनाकारण शत्रुत्व ओढवून घ्याल, दानधर्मासाठी खर्च कराल; वाचा तुमच्या नशिबात आज काय लिहिलंय?

Fact Check : गणपतीसारख्या दिसणाऱ्या बाळाचा जन्म? काय आहे व्हायरल व्हिडिओमागचं सत्य?

Maharashtra Politics: महायुतीचं बेताल त्रिकूट; देवेंद्र फडणवीसांच्या वक्तव्याला नेत्यांकडून हरताळ

SCROLL FOR NEXT