Darshana Pawar Death Case saam tv
मुंबई/पुणे

Darshana Pawar Death Case : शेवटचं बोलायचं म्हणून राजगडावर नेलं, अन्... दर्शना पवारच्या हत्येचं धक्कादायक कारण आलं समोर

Darshana Pawar News : दर्शनाची हत्या झाल्याच्या दिवसापासून राहुल हांडोरे गायब होता.

Dnyaneshwar Choutmal

Pune News : एमपीएससी (MPSC) टॉपर दर्शना पवार हत्या प्रकरणाचं गूढ हळूहळू उलगडू लागलं आहे. दर्शना पवार हत्या प्रकरणी तिचा मित्र राहुल हांडोरेला पुणे पोलिसांनी मुंबईतून ताब्यात घेतलं आहे. दर्शनाची हत्या झाल्याच्या दिवसापासून राहुल गायब होता. त्याला पकडण्यासाठी पोलिसांनी पथकेही तयार केली होती.

राहुलला ताब्यात घेतल्यानंतर दर्शना पवारच्या हत्येचं कारणंही आता समोर आलं आहे. प्राथामिक तपासातील माहितीनुसार, राहुल हांडोरेला दर्शनासोबत लग्न करायचं होतं. मात्र एमपीएससी उत्तीर्ण होण्याआधीपासून दर्शनाच्या कुटुंबियांनी तिच्या लग्नासाठी मुले बघण्यास सुरुवात केली होती. यामुळे संतापलेल्या राहुलने तिची हत्या केली, अशी माहिती मिळत आहे.

शेवटचं बोलायचं म्हणून राजगडावर नेलं

दर्शना आणि राहुल दोघे नातेवाईक होते. दोघेही एकत्रच एमपीएससी परीक्षेचा अभ्यास करत होते. राहुलला आधीपासून दर्शनाशी लग्न करण्याची इच्छा होती. मात्र दर्शना आणि तिच्या घरच्यांनी लग्नाला नकार दिला होता.  (Pune News)

दर्शना हिचे दुसऱ्या मुलासोबत लग्नही ठरले होते. दर्शनाचं दुसऱ्या कुणाशीतरी लग्न होणार या विचाराने राहुल अस्वस्थ होता. यानंतर राहुलने दर्शनाला शेवटचे बोलायचे म्हणून राजगडवर नेले आणि दर्शनाचा खून केला, अशा प्राथमिक माहिती मिळत आहे. पुणे पोलीस याप्रकरणी दुपारी 12.30 वाजता पत्रकार परिषद घेणार आहेत.

राहुल हत्येच्या दिवसापासून गायब

दर्शना पवार तिचा राहुलसोबत १२ जूनला राजगडावर फिरायला गेली होती. मात्र जवळील हॉटेलच्या सीसीटीव्ही फूटेजमध्ये राहुल एकटाच राजगडावरुन खाली उतरताना दिसला होता. त्या दिवसापासून राहुल हांडोरे गायब होता. त्यामुले दर्शनाची हत्या राहुलनेच केल्याचा संशय पोलिसांना होता. त्याला पकडण्यासाठी पुणे पोलिसांनी पाच पथकंही तयार केले होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ashadhi Ekadashi : अवघे गरजे पंढरपूर…! मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते विठुरायाची शासकीय महापूजा संपन्न

Pune Crime : पुण्यातील प्रसिद्ध रीलस्टारवर जीवघेणा हल्ला, तिघांकडून बेदम मारहाण; शहरात खळबळ

Hafiz Saeed: मुंबई हल्ल्याच्या मास्टर माईंड हाफिसला भारताच्या ताब्यात देणार पाकिस्तान; प्रत्यार्पणासाठी ठेवली मोठी अट

Dry Fruits: पावसाळ्यात ड्राय फ्रुट्स साठवण्यासाठी वापरा 'या' सिंपल टिप्स

Sunday Horoscope : आषाढी एकादशीला होणार विष्णूची कृपा; 'या' राशींच्या लोकांवर धनाचा वर्षाव होणार

SCROLL FOR NEXT